द.सा. बोरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द.सा.बोरकर या पानावरून पुनर्निर्देशित)
द.सा. बोरकर
मृत्यू १ एप्रिल इ.स. २०१२
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
अपत्ये डॉ. मुक्ता बोरकर (कन्या)

प्रा. द.सा. बोरकर (जन्मदिनांक अज्ञात - १ एप्रिल इ.स. २०१२) हे मराठी साहित्यिक होते. महाराष्ट्राच्या पूर्वभागातल्या झाडीमंडळ किंवा झाडीपट्टी[१] या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागातल्या झाडीबोली या बोलीतही बोरकर लिहीत असत.

जीवन[संपादन]

द.सा. बोरकर लाखनी (भंडारा जिल्हा) येथे समर्थ नगरात राहत.

  • द. सा. बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची शाखा स्थापन केली. त्याचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
  • मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त, वैनगंगा मानवता सेवासंघ, स्नेही मित्रमंडळाचे अध्यक्ष, झाडीबोली साहित्य परिषदेचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषविली.
  • लाखनी येथे इ.स. १९७१ला झालेले तिसऱ्या भंडारा जिल्हा साहित्य संमेलनाचे, इ.स. १९९१ मध्ये झालेले ४३व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे व इ.स. २००२मध्ये झालेल्या चवथ्या जनसाहित्य संमेलनाचे ते संयोजक होते.
  • इ.स. २००३ला झालेल्या ५४व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष राहिले.
  • इ.स. १९९६मध्ये श्रीक्षेत्र आंभोरा येथे झालेल्या आद्यकवी मुकुंदराज मित्रमेळाव्याचे ते उद्‌घाटक होते.
  • इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • यांशिवाय प्रत्येक साहित्य संमेलनात ते सहभागी होत असत.
  • शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

कविता संग्रह[संपादन]

  1. गुढी
  2. तोरण

स्फुट लेखसंग्रह[संपादन]

  1. स्वागत सुमने

भाषणसंग्रह[संपादन]

  1. बंधू-भगिनींनो
  2. आपले सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम व सण

निधन[संपादन]

१ एप्रिल इ.स. २०१२ रोजी त्यांचे ७३व्या वर्षी अपघाती निधन झाले.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. इ.स. २०११च्या भारतीय जनगणनेनुसार, झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात.