झाडीबोली
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
झाडीबोली नावाची एक बोली महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असलेल्या काही भागात बोलली जाते.. महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष लोक झाडीबोली बोलतात.[ संदर्भ हवा ]
झाडीबोलीची वैशिष्ट्ये
[संपादन]नद्या,तलावांचा प्रदेश ,घनदा जंगल,जंगलातील गावे वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा,लोकजीवन,रितीरिवाज,सण,लोककला दंडार आणि इतर
लोकसाहित्य
[संपादन]झाडीबोलीत लोकसाहित्याचे क्रीडागीते, पाळणागीते, सासुरवाशिणीची गीते, रोवण्याची गाणी, महादेवाची गाणी, बिरवे, भिंगीसोंग आणि दंडीगान भुलाबाईची गाणी असे काव्यप्रकार आहेत. त्यांशिवाय, दंडार, खडीगंमत, गंगासागर, डहाका आणि गोंधळ हे नाट्यप्रकार आहेत.त्यापैकी गंगासागर, डहाका व गोंधळ हे देवतांशी संबंधित आहेत.
नियतकालिके
[संपादन]झाडीबोलीचे स्वतःचे मासिक आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले मासिक आहे. [ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
[संपादन]झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील कथा १६ मार्च १९८० च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय.[ संदर्भ हवा ] तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कविता समजली जाते.[ संदर्भ हवा ]
'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.
झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.
कविता संग्रह
[संपादन]- अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे -९ जाने २०००)
- अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे -२००५)
- आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल -२००४)
- आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल -९ जानेवारी २०००)
- कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह - संपादक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ना. गो. थुटे -२००२)
- कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर -२००२)
- घामाचा दाम (डोमा कापगते)
- झाडीची माती (मिलिंद रंगारी -२००८)
- झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार -२००३)
- झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत) -२००६)
- प्रीत ( अश्लेष माडे-२०१३)
- माजी मायबोली (बापुराव टोंगे -२००८)
- माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार -२००२)
- मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले -२००७)
- मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
- रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
- रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे -२००२)
- सपनधून (कवी ना.गो. थुटे -१ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित कवितासंग्रह
- सोनुली (पांडुरंग भेलावे -२००६)
- हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे (रमानंद) -२००२)
- भूभरी (कवितासंग्रह कवी अरुण झगडकर-३ जाने.२०२१)
- आंबील (कवितासंग्रह कवी सुनील पोटे -११ जुलै २०२१)
- मोरघाड (लक्ष्मण खोब्रागडे,)
- लीपन(लक्ष्मण खोब्रागडे,)
कथासंग्रह
[संपादन]- कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे -२००९)
- गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर -२००१)
- चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे -२००८)
- झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल -२००१)
- पोरका (मा.तु. खिरटकर -२००१
- वास्तुक (घनश्याम डोंगरे -.१९९८) झाडीबोलीतला पहिला कथासंग्रह.
- विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार -२००२)
कादंबऱ्या/चरित्रे
[संपादन]- झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे -२०१२)
- बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
- भाराटी (घनश्याम डोंगरे)
- बेवारस (धनंजय पोटे)
अन्य साहित्य
[संपादन]- झाडीबोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
- झाडीबोली-मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
- झाडीबोली ते मराठी शब्दकोश (अरुण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे) (२०२४)
पुरस्कार
[संपादन]- ’भाराटी'ला नाशिक येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
- ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
- डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर ग्रामीण विगाभाच्या वतीने सन २०१९-२० चे पुरस्कार
झाडीबोली नाट्य कलावंत पुरस्कार डाॕ.परशुराम खुणे
झाडीबोली काव्यलेखन पुरस्कार मुरलीधर खोटोले
झाडीपट्टी उत्कृष्ट चित्रकार पुरस्कार बंशी कोठेवाड
वैचारिक साहित्य लेखन पुरस्कार अॕड.लख्खनसिंह कटरे
मराठी कथालेखन पुरस्कार मा.आनंदराव बावणे सर
झाडीबोली साहित्य संमेलने
[संपादन]- १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत (इ.स.२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने बावीस साहित्य संमेलने घेतली आहेत.
- इ.स. १९९५ च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रा. द.सा.बोरकर यांनी भूषविले होते.
- १२व्या संमेलनाच्या अध्यक्षा अंजनाबाई होत्या.
- १८वे झाडीबोली साहित्य संमेलन - १९-२० डिसेंबर २०१०. बोंडगावदेवी (गोंदिया जिल्हा) येथे.
- १९वे, २४-२५ डिसेंबर २०११, भजेपार (अंजोरा) येथे; अध्यक्ष कवी व कथाकार राम महाजन
- २०वे झाडीबोली संमेलन, ७-८ जानेवारी २०१३, नवेबांधगाव (गोंदिया) येथे; अध्यक्ष : नीलकंठ रणदिवे
- २१वे झाडीबोली साहित्य संमेलन : ११-१२ जानेवारी २०१४, आसगाव तर्फे पवनी येथे; अध्यक्ष : बापूरावजी टोंगे
- २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
- २४वे झाडीबोली साहित्य संमेलन जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात राका या गावी झाले.
- २५वे झाडीबोली साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबर २०१७ रोजी भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.
मराठी साहित्य संमेलन
[संपादन]डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी झाडीपट्टीतील साकोली येथील जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाच्या तळोधी-बाळापूर येथील संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन
[संपादन]- १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
झाडीपट्टी रंगभूमी
[संपादन]झाडीपट्टी रंगभूमी ही आपले वेगळेपण जपत कार्यशील आहे. या रंगभूमीने हजारो कलावंत घडवले आहेत. या झाडीपट्टी प्रदेशात जवळपास पन्नास नाट्यमंडळे असून, येथे दोनशेहून अधिक नाटकांचे लिखाण झाले आहे. शंभराहून अधिक नाट्यलेखक आपल्या लेखणीद्वारे नाटयलेखन करीत आहेत.
सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तनेे, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. लोककलांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे महोत्सव होत असतात. नाटकाचे मूळ भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांतूनच आढळून येते. लोककलांमधूनच नाटकाची उत्क्रांती झाली आहे.असे म्हणता येईल.झाडीपट्टीत पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर व्हायच्या असा उल्लेख आढळतो. इसवी सन १८८६मध्ये नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. नाटकाच्या प्रेमापोटी पुण्या-मुंबईतील नाटके पाहण्यासाठी झाडीपट्टीचे कलावंत नागपुरात जात असत. तेथील प्रयोग बघत असत. त्यांना त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. हा वेगळेपणा त्यांना अधिक प्रमाणात प्रेरित करीत होता. त्यामुळे येथील दंडारकर्मींनी तिथून धडे घेणे सुरू केले आणि दंडारीचे रूपांतर नाटकात होऊ लागले. झाडीपट्टी रंगभूमीवर नवरगाव येथील बालाजी पाटील बोरकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी १९०९ मध्ये चिलिया बाळाची भूमिका केली होती.असे अनेक कलावंत येथे घडले.झाडीपट्टी रंगभूमीवर म्हणावे तेवढे संशोधन झालेले दिसत नाही अर्थातच काही सन्मानीय अपवाद वगळता फारसे संशोधन झालेले नाही. नवसंशोधकांसाठी हे एक नवे आव्हान आहे. यावरती संशोधन करणे आवश्यक आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे योगदान एकूणच मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी फार मोलाचे आहे .झाडीपट्टी रंगभूमीवरील संशोधन भावी काळातील संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो.झाडीपट्टी रंगभूमीवर लेखन व सादरीकरण यातील वैविध्यपूर्ण आहे. झाडीपट्टी रंगभूमीला अनेक कलावंतांनी उभे केले आहे.झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकला रुजविण्यात कोहळी समाजाचे लक्षणीय योगदान आहे. हा कोहळी समाज जमीनदारी आणि मालगुजारी करायचा.या कलारसिकांना दंडारी पाहण्याचा छंद होता. त्यांनी स्वतःचे दंडारमंडळ आणि त्यानंतर नाट्यमंडळ गावोगावी सुरू केले.यातून झाडीपट्टी रंगभूमी बहरली.सण-उत्सवात निमित्ताने आगळ्यावेगळ्या पण वैभवशाली, गौरवसंपन्न आणि समृद्ध अशा लोक उत्सवांची रेलचेल या भागात असते. यामध्ये मंडई, शंकरपट, गळ, यात्रा यांचा समावेश आहे. विविध कला प्रकार येथे सादर केले जातात.विविध सण उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरिीत्या साकार होणारी दंडार, नाटकं, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो.सर्व लोककला प्रकार झाडीपट्टी रंगभूमीवर सादर केले जातात.नाट्यसादरीकरणासाठी नेपथ्यात पडदे, सिनसिनेरी वापरतात. संगीताचे साहित्य वाद्य तयार केले. झाडीपट्टी रंगभूमीवर तीन-तीन महिने तालीम करून नाटक बसवतात. नाटय निर्माते पेटीमास्टर, दिग्दर्शकाकडून गाणी बसवून घेत असतात. झाडीपट्टी रंगभूमी ही मराठी रंगभूमीवरील एक समृद्ध रंगभूमी म्हणून ओळखली जाते झाडीपट्टी रंगभूमी ने आपले लेखन सादरीकरण यातील वैविध्य यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले आहे.या उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरिीत्या साकार होणारी दंडार, नाटकं, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो. अस्सल झाडीबोली भाषेतील संगीतमयी सांस्कृतिक नाट्यपरंपरेच्या या भूमीला झाडीपट्टी रंगभूमी म्हणून अनेक दशकांपासून ओळख मिळाली आहे.माहिती-तंत्रज्ञानाच्या आजच्या इंटरनेट युगात मानवी मनाला हवे ते अगदी सेकंदात ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळत असूनही झाडीतला प्रेक्षक मात्र झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचा दिलदारपणे आस्वाद घेतो, ही झाडीपट्टी रंगभूमीची ही एक खासियत म्हणावी लागेल. रात्री १० वाजेपासून पहाटेपर्यंत चालणारी नाटकं हेही एक वैशिष्ट्य! येथील रंगभूमीची मनोभावे सेवा करून आपली कला अर्पण करणारे सारे कलावंत आणि त्यावर जीव ओवाळत प्रेम करणारे रसिक यांच्यामुळे झाडीच्या प्रत्येक नाटकाला आजही तोबा गर्दी उसळते. आजपासून तब्बल ९० वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन भारताच्या इंग्रज सत्ताधाऱ्यांनासुद्धा झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांनी पार वेड लावले होते. इंग्रजांना मराठी भाषा समजत नसल्यामुळे भाषांतरकाराची मदत घेऊन मराठीचे हिंदी, इंग्रजी भाषेत रूपांतर केले जात होते.ब्रिटिश सरकारने झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचा आस्वाद घेतला होता.
झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक योगदान
[संपादन]कला आणि समाज या दृष्टीने झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक महत्त्व फार आहे. नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन साधण्याचे काम होत आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जात आहे. अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या लोकांना नाटकांच्या निमित्ताने गावाची ओढ लागते. त्यांची मातीशी नाळ कायम जुळवून ठेवण्याचे काम झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून होत आहे. गावात पाहुणे येत असल्याने अनेक उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्याचा योग या निमित्तानं साधला जातो.सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग झाल्यावर नवेगावबांधच्या नाट्य मंडळाने प्रस्तुत केलेल्या नाटक प्रयोगांनी प्रभावित होऊन तत्कालीन कलेक्टर स्मिथ यांनी श्री बालाजी प्रासादिक नाट्य मंडळाचे कर्तेधर्ते सीताराम पाटील डोंगरवार यांचा पदक देऊन त्यांचा गुणगौरव केला. आजही ते मेडल सीताराम पाटलांचे नातू नारायण माधवराव डोंगरवार, रा.धाबेपवनी (जि.गोंदिया) यांच्या घरी जपून ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून झाडीच्या रंगभूमीचा प्रभाव आणि लोकप्रियता यातून स्पष्ट होते. सीताराम पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात नवेगावबांध येथील कलाकार मंडळींनी सिंहाचा छावा हे संगीत नाटक सादर केले. या नाटकात अरण्यपुत्र माधवराव डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, लटारू पोतदार, गणा गायकवाड, सीताराम पवार, काशिनाथ डोंगरवार, आत्माराम बाळबुद्धे, पंढरी डोंगरवार, हरी खुणे, पांडुरंग बोरकर, रामा डोंगरवार यांनी अभिनय केला होता, अशी माहिती उपलब्ध आहे. कलेला कसलेही बंधन नसतात.केवळ अंगभूत असलेल्या कलेच्या जोरावर येथील कलावंत रंगभूमीवर आपली कला सादर करीत आहे. परंतु झाडीपट्टीमध्ये अभिनय, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्यास झाडीपट्टी रंगभूमीचे भविष्य आणखी उज्वल होऊ शकते.झाडीपट्टी रंगभूमीने आपले वेगळे पण जपत प्रादेशिक भान ठेवून जागतिकीकरणातही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगभूमी आहे या रंगभूमीने समग्र भारतीय रंगभूमीला सशक्त कलावंत दिलेले आहेत .भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात झाडीबोलीत पट्टी रंगभूमीचे योगदान हे अनमोल आहे . झाडीपट्टी रंगभूमी या देशातील एक अतिशय समृद्ध अशी रंगभूमी आहे .झाडीपट्टी रंगभूमीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे.
झाडीबोली भाषेतील काही शब्द व त्याचे मराठीतील अर्थ
[संपादन]झाडीबोलीतील शब्द | मराठीतील त्या अर्थाचा किंवा त्याचे जवळपास पोचणारा शब्द |
---|---|
आढं | माळा/गच्ची/छत |
ऊबार | जास्तीचा |
कऊल | कवेलू (Roof Tile) |
काउन | कां म्हणून |
खाती | लोहार |
खाल्तं | खाली/खालचे बाजूस |
खासर | खाचर |
चेंगणे | चढणे |
जगरं | कुंभाराने, कच्चे मातीचे मडके भाजण्यासाठी रचलेली गवऱ्यांची (शोभण्याची) आरास) |
तांदुर | तांदुळ |
पुन्नाहुन | पुन्हा/परत |
बंडी | बैलगाडी |
बंडी उलार | (बंडीचे चाकाच्या/अक्षाच्या मागच्या बाजूस जास्त भार लादल्याने समोरची बाजू वर होण्याची स्थिती) |
भासरा | नवऱ्याचा मोठा भाऊ/ दीर |
वद्र | वरती/वरचे बाजूस |
हे सुद्धा पहा
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |