इ.स. १९९५
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ - १९९८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी १७ - जपानमधील कोबेत ७.३ मापनाचा भूकंप. ६,४३३ ठार. अपरिमित वित्तहानी.
- फेब्रुवारी ७ - इ.स. १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.
- फेब्रुवारी १७ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
- फेब्रुवारी २१ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
- फेब्रुवारी २१ - स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- मार्च २ - बारिंग्ज बँकचा घोटाळ्यात निक लीसमला अटक.
- मार्च ३ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.
- एप्रिल १९ - ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
- मे १७ - जॉक शिराक फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- मे १८ - अलेन जुप्पे फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- मे २३ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
- मे २५ - बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.
- जून २९ - दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची इमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै ११ - अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.
- जुलै ११ - स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.
- जुलै ११ - क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.
- जुलै १७ - अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
- जुलै १८ - कॅरिबिअन समुद्रातील मॉॅंतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
- जुलै २५ - पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
- जुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी दुसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- डिसेंबर २८ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.
जन्म
[संपादन]- ६ सप्टेंबर - मुस्तफिझुर रहमान, बांग्लादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी २ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार
- फेब्रुवारी ८ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल.
- फेब्रुवारी १४ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.
- मे ५ - मिखाईल बॉट्व्हिनिक, रशियाचा बुद्धिबळपटू.
- मे २४ - हॅरोल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- जून ९ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
- ऑगस्ट ३१ - बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री
- सप्टेंबर १८ - काका हाथरसी, हिंदी कवी.