आंभोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंभोरा येथील पाच नद्यांचा संगम

आंभोरा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात येते. हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ असून वैनगंगा नदीच्या किनारी वसले आहे. हे ठिकाण वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा, आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे अत्यंत सुंदर स्थळ असून येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. येथून जवळच गोसेखुर्द धरण आहे. बहुचर्चित आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असल्याचा मान मिळालेला जय वाघ हा येथून जवळच असलेल्या कऱ्हाडला अभयारण्यातच होता.

वैशिष्ट्ये[संपादन]

या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले चैतन्येश्वर मंदिर आणि येथील चैतन्येश्वर महादेवाची लिंगपिंड स्थापन केलेली नसून ती यज्ञातून स्वयं प्रकट झालेली आहे, असे सांगतात.. येथेच श्री हरिनाथ शिष्य रामचन्द्र उर्फ रघुनाथ यांची जीवंत समाधी आहे. काहींच्या मते, याच समाधीसमोर बसून मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी पवनामृत, पवनविजय हे ग्रंथ शा.श. १११० साली लिहिले.

मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू हा अंबेजोगाई या बीड जिल्ह्यातील गावी लिहिलेला आहे [१] [२] [३] [४].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "लोकसत्ता:मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा करण्याची मागणी" (मराठी मजकूर). १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  2. ^ "मराठवाडा नेता[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  3. ^ "लोकसत्ता:मराठी कवितेसाठी" (मराठी मजकूर). १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  4. ^ "सकाळ" (मराठी मजकूर). १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.