देगलूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देगलूर विधानसभा मतदारसंघ - ९० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, देगलूर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. देगलूर आणि २. बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश होतो. देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

हा मतदारसंघ इ.स. २००९ साली अस्तित्वात आला. त्याआधी याचा बहुतांश भाग बिलोली मतदारसंघात मोडत असे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जितेश रावसाहेब अंतापुरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०२१ (पोटनिवडणूक)[५] जितेश रावसाहेब अंतापुरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ रावसाहेब जयंता अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुभाष पिराजी साबणे शिवसेना
२००९ रावसाहेब जयंता अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी, कशी झाली निवडणूक?".