कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ
Appearance
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ - २५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदार संघ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कराड उत्तर मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसेसावळी महसूल मंडळ, २. कोरेगांव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर ही महसूल मंडळे आणि रहिमतपूर नगरपालिका, ३. सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि नागठाणे ही महसूल मंडळे आणि ४. कराड तालुक्यातील इंदोली, मसूर, उंब्रज आणि कोपर्डे हवेली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे श्री मनोज भीमराव घोरपडे
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील | अपक्ष | |
2024 | मनोज दादा घोरपडे | बीजेपी |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कराड उत्तर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शामराव पांडुरंग पाटील | अपक्ष | १०१६५८ |
अतुल सुरेश भोसले | राष्ट्रवादी | ६०५७१ |
वासुदेव हणमंत माने | शिवसेना | १००८२ |
बाळासाहेब पांडुरंग पाटील | अपक्ष | १८८४ |
विलास बाबू पवार | बसपा | १३६२ |
अशोकराव गणपतराव चव्हाण | मनसे | ११७३ |
अतुलकुमार भगवानराव देशकार | अपक्ष | ६४४ |
शामराव आबा पाटील | अपक्ष | ५८८ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |