आमगाव विधानसभा मतदारसंघ
Appearance
आमगांव विधानसभा मतदारसंघ - ६६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आमगांव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. देवरी, २. सालेकसा आणि ३. आमगांव या तालुक्यांचा समावेश होतो. आमगांव हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसराम मारोती कोरोटे हे आमगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]आमगाव विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- आमगाव तालुका
- देवरी तालुका
- सालेकसा तालुका
आमगाव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
आमगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रामरतनबापू भरतबापू राउत | काँग्रेस | ६४,९७५ |
रमेश नारायण तरम | भाजप | ५८,१५८ |
शंकरभाऊ गुणेलालजी माडवी | अपक्ष | १७,६९८ |
पुष्पा अंबरलाल माडवी | बसपा | ६,५५५ |
ओमप्रकाश आत्माराम मस्राम | रिपाई (आ) | १,९१४ |
श्रवण भोलाराम राणे | अपक्ष | ९७४ |
नालेंज केशवराव मर्स्कोले | अपक्ष | ९३२ |
रघुनाथ फागणू मरकम | गोंगपा | ६३६ |
मधू लटरू कुरसुंगे | अपक्ष | ५५९ |
डोमाजी हगरू मर्स्कोले | अपक्ष | ४८३ |
बाह्य दुवे
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).