"शंकर दत्तात्रेय जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ३३: ओळ ३३:
}}
}}


[[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] '''शंकर दत्तात्रेय जावडेकर''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. [[पुणे|पुण्यात]] [[इ.स. १९४९|१९४९]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/management-of-fruit-and-vegetable-after-removals-298832/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=१० डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
[[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] '''शंकर दत्तात्रेय जावडेकर''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. [[पुणे|पुण्यात]] [[इ.स. १९४९|१९४९]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/management-of-fruit-and-vegetable-after-removals-298832/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=१० डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>


सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये [[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये [[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.

१६:५०, २ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

शंकर दत्तात्रेय जावडेकर

आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर (सप्टेंबर २६, १८९४ - १० डिसेंबर, १९५५) हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.[१]

सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.

’आधुनिक भारत' या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्त्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी 'गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ' असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी[ या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्‍सची भर पडली.) या सर्व द्रष्टय़ा नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले आणि त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झाले. जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे 'बोले तसा चाले' या वृत्तीचा आविष्कार होते. नैतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे.

जावडेकर गांधीवादी अहिंसेचे कट्टर पुरस्कर्ते होते. जावडेकर यांचे जीवन आणि विचार आजही आदर्शवत ठरावेत असे आहेत.

शं.द. जावडेकरांनी लिहिलेली पुस्तके

  • आधुनिक भारत
  • गांधीवाद
  • जवाहरलाल नेहरू
  • लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी
  • लोकशाही
  • हिंदू-मुसलमान ऐक्य


शं.द. जावडेकर यांच्या संबंधी लिहिली गेलेली पुस्तके

  • आचार्य शं. द. जावडेकर : व्यक्तित्त्व आणि विचार (प्रकाशक - प्राज्ञपाठशाळा मंडळ ग्रंथालय)
  • शं.द.जावडेकर विचारदर्शन (लेखक - नागोराव कुंभार)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (१० डिसेंबर २०१३). लोकसत्ता http://www.loksatta.com/navneet-news/management-of-fruit-and-vegetable-after-removals-298832/. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)