माज्या जल्माची चित्तरकथा (आत्मचरित्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माज्या जल्माची चित्तरकथा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
माज्या जल्माची चित्तरकथा
लेखक शांताबाई कांबळे
भाषा मराठी
देश महाराष्ट्र , भारत
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था उषा वाघ,सुगावा प्रकाशन.
प्रथमावृत्ती १९८२
चालू आवृत्ती बुध्दपौर्णिमा ,११ मे १९९८
मुखपृष्ठकार चंद्रकांत कांबळे.
विषय ISBN :8 1-86182-34-
पृष्ठसंख्या १५०
आय.एस.बी.एन. ISBN :8 1-86182-34-

माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.

दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली 'पूर्वा' मासिकात पथमतः छापण्यात आले.

पार्श्वभूमी[संपादन]

जन्माने महार. पुढे 56 साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवय्राने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निव्ृत्त् झाली.

मालिका[संपादन]

या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे[१].

संदर्भ[संपादन]