एप्रिल ८
<< | एप्रिल २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९८ वा किंवा लीप वर्षात ९९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यू यॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
- १८६६ - इटली आणि पर्शियाची ऑस्ट्रिया-हंगेरी विरोधात युती.
विसावे शतक[संपादन]
- १९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
- १९२१: आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
- १९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
- १९५० - भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षऱ्या.
- १९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
- २००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- १३३६:तैमूरलंग – मंगोलियाचा राजा
- १९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व
- १९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई
- १९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान
- १९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी
मृत्यू[संपादन]
- १८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू.
- १८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी
- १९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर
- १९२२:’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक
- १९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी
- १९७३ - पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार
- १९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक
- १९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर
- २०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर
- २०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- जपान - बुद्धाचा जन्मदिवस.
- जागतिक रोमा (रोमनियन) दिवस.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - (एप्रिल महिना)