"ह.मो. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २७: | ओळ २७: | ||
* अण्णांची टोपी (कथासंग्रह) |
* अण्णांची टोपी (कथासंग्रह) |
||
* आजची नायिका (उपरोधिक) (कथासंग्रह) |
* आजची नायिका (उपरोधिक) (कथासंग्रह) |
||
* इतिवृत्त |
* इतिवृत्त (कादंबरी) |
||
* इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह) |
* इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह) |
||
* उलटा आरसा (उपरोधिक) |
* उलटा आरसा (राजकीय उपरोधिक) |
||
* एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३) |
* एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३) |
||
* कलियुग |
* कलियुग (कादंबरी) |
||
* कुरुक्षेत्र (कादंबरी) |
|||
* काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक) |
|||
* काळेशार पाणी (कादंबरी) |
|||
* घोडा (कथासंग्रह) |
* घोडा (कथासंग्रह) |
||
* चुनाव रामायण (व्यंगकथा) |
* चुनाव रामायण (व्यंगकथा) |
||
* ज्वालामुख (कथासंग्रह) |
* ज्वालामुख (कथासंग्रह) |
||
* टार्गेट |
* टार्गेट |
||
* डार्क वॉटर्स (ह.मो. मराठे यांच्य काळेशारपाणी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद, अनुवादक - लीला बावडेकर) |
|||
* द बिग बॉस (व्यंगकथा) |
* द बिग बॉस (राजकीय व्यंगकथा) |
||
* दावं (कथासंग्रह) |
* दावं (कथासंग्रह) |
||
* दिनमान (उपरोधिक लेख) |
* दिनमान (‘क्लोकप्रभा’ व ‘घरदार’मधील संपादकीय उपरोधिक लेख) |
||
* देवाची घंटा |
* देवाची घंटा (कादंबरी) |
||
* नरिमन पॉईंटचा समुद्र (कादंबरी) |
|||
* न लिहिलेले विषय (वैचारिक) |
* न लिहिलेले विषय (वैचारिक) |
||
* निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२) |
* निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (कादंबरी, १९७२) |
||
* नो सेन्टिमेन्ट्स प्लीज (कादंबरी) |
|||
* न्यूज स्टोरी |
* न्यूज स्टोरी |
||
* पहिला चहा (भाग १, २). : दैनिक [[पुढारी]]मधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह. |
* पहिला चहा (भाग १, २). : दैनिक [[पुढारी]]मधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह. |
||
* पक्षिणी (कथासंग्रह) |
* पक्षिणी (कथासंग्रह) |
||
* पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा |
* पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा दुसरा भाग) |
||
* प्रास्ताविक |
* प्रास्ताविक (कादंबरी) |
||
* बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा) |
* बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा) |
||
* बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे) |
* बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे) |
||
* मधलं पान (लेखसंग्रह) |
* मधलं पान (लेखसंग्रह) |
||
* माधुरीच्या दारातील घोडा (कथासंग्रह) |
* माधुरीच्या दारातील घोडा (कथासंग्रह) |
||
* मार्केट (१९८६) |
* मार्केट (१९८६) (कादंबरी) |
||
* मुंबईचे उंदीर (व्यंगकथा) |
* मुंबईचे उंदीर (व्यंगकथा) |
||
* माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा) |
* माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा) |
||
* युद्ध (कथासंग्रह) |
* युद्ध (कथासंग्रह) |
||
* लावा (मराठे यांच्या कथांचा हिंदी अनुवाद, अनुवादक - प्रकाश भातंब्रेकर) |
|||
* लावा (हिंदी) |
|||
* वंशविद्वेषाच्या वणव्यात श्रीलंका (श्रीलंकेच्या प्रश्नावरील पहिले मराठी पुस्तक) |
|||
* वीज (बाल साहित्य) (कथासंग्रह) |
* वीज (बाल साहित्य) (कथासंग्रह) |
||
* श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा) |
* श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा) |
||
* सापेक्ष (कथासंग्रह) |
* सापेक्ष (कथासंग्रह) |
||
* सॉफ्टवेअर |
* सॉफ्टवेअर (कादंबरी) |
||
* स्वर्गसुखाचे package (विनोदी) |
* स्वर्गसुखाचे package (विनोदी) |
||
* हद्दपार (कथासंग्रह) |
* हद्दपार (कथासंग्रह) |
||
ओळ ७५: | ओळ ८०: | ||
* .... शिवधर्म... |
* .... शिवधर्म... |
||
* संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का? |
* संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का? |
||
==ह.मो. मराठे यांच्या साहित्यावरील समीक्षा== |
|||
* निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी : संहिता आणि समीक्षा (समीक्षक - शंकर सारडा) |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
२१:३५, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
हनुमंत मोरेश्वर मराठे (जन्म : २ मार्च १९४० (अंदाजे; नकी तारीख हमोंनाही माहीत नव्हती. निधन : २ ऑक्टोबर २०१७ ) हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक होते. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येई.
हमोंना त्यांच्या बाबल नावाच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. ना.सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त एस.एम. जोशी यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. .
मराठी साहित्य संमेलनापूर्वी केलेले निवेदन
ह.मो. मराठे चिपळूणला भरणाऱ्या ८६व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्रांतून एक निवेदन दिले. ते असे :
" ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?' हा माझा प्रदीर्घ लेख ‘किस्त्रीम'च्या २००४च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांविषयीच्या अपप्रचाराला नवे उधाण येत असल्याचे मला जाणवत होतेच. पण, ५ जानेवारी २००४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड'ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले.
जेम्स लेन नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, ‘‘दादोजी कोंडदेव हा महाराजांचा जन्मदाता पिता होता असा ज्योक महाराष्ट्रात सांगण्यात येतो. भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरीलप्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांनी वरील हल्ला केला होता. दुस-या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वतः यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २००४ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वाऱ्याावर सोडण्यात आले.
ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे.
हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे खून ब्राह्मणांनीच केले असे सांगितले जाऊ लागले आहे. या द्वेषमूलक अपप्रचाराला साधार आणि तर्कशुद्ध उत्तरे देणे आवश्यकच झाले आहे. ब्राह्मणांनी भारतीय समाजाची जडणघडण, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा इत्यादी क्षेत्रात केलेले कार्यही बहुजन समाजातील नवशिक्षित तरुण पिढीसमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातींत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे."
हे निवेदन ’जातिद्वेषमूलक’ आहे असे आरोप झाल्याने ह.मो. मराठ्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.
प्रकाशित साहित्य
ग्रंथ
- अण्णांची टोपी (कथासंग्रह)
- आजची नायिका (उपरोधिक) (कथासंग्रह)
- इतिवृत्त (कादंबरी)
- इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
- उलटा आरसा (राजकीय उपरोधिक)
- एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
- कलियुग (कादंबरी)
- कुरुक्षेत्र (कादंबरी)
- काळेशार पाणी (कादंबरी)
- घोडा (कथासंग्रह)
- चुनाव रामायण (व्यंगकथा)
- ज्वालामुख (कथासंग्रह)
- टार्गेट
- डार्क वॉटर्स (ह.मो. मराठे यांच्य काळेशारपाणी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद, अनुवादक - लीला बावडेकर)
- द बिग बॉस (राजकीय व्यंगकथा)
- दावं (कथासंग्रह)
- दिनमान (‘क्लोकप्रभा’ व ‘घरदार’मधील संपादकीय उपरोधिक लेख)
- देवाची घंटा (कादंबरी)
- नरिमन पॉईंटचा समुद्र (कादंबरी)
- न लिहिलेले विषय (वैचारिक)
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (कादंबरी, १९७२)
- नो सेन्टिमेन्ट्स प्लीज (कादंबरी)
- न्यूज स्टोरी
- पहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.
- पक्षिणी (कथासंग्रह)
- पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा दुसरा भाग)
- प्रास्ताविक (कादंबरी)
- बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)
- बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)
- मधलं पान (लेखसंग्रह)
- माधुरीच्या दारातील घोडा (कथासंग्रह)
- मार्केट (१९८६) (कादंबरी)
- मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
- माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
- युद्ध (कथासंग्रह)
- लावा (मराठे यांच्या कथांचा हिंदी अनुवाद, अनुवादक - प्रकाश भातंब्रेकर)
- वंशविद्वेषाच्या वणव्यात श्रीलंका (श्रीलंकेच्या प्रश्नावरील पहिले मराठी पुस्तक)
- वीज (बाल साहित्य) (कथासंग्रह)
- श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
- सापेक्ष (कथासंग्रह)
- सॉफ्टवेअर (कादंबरी)
- स्वर्गसुखाचे package (विनोदी)
- हद्दपार (कथासंग्रह)
- ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)
पुस्तिका
- आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी
- गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ
- ब्राह्मण चळवळ कशासाठी?
- ब्राह्मणनिंदेची नवी लाट
- ब्राह्मणमानस
- ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४)
- विद्रोही ब्राह्मण
- .... शिवधर्म...
- संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?
ह.मो. मराठे यांच्या साहित्यावरील समीक्षा
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी : संहिता आणि समीक्षा (समीक्षक - शंकर सारडा)
कारकीर्द
- संपादक, दैनिक गोमंतक,
- संपादक, साप्ताहिक लोकप्रभा (१९८६-१९८७)
इतर
- ह.मो. मराठे यांच्या ’न्यूज स्टोरी’ या मूळ कथेवर ’दोन स्पेशल’ हे नाटक बेतले आहे. क्षितिज पटवर्धन हे नाट्यलेखक आणि दिग्दर्शक आहेत. ह्या नाटकाला ’लोकसत्ता’च्या संपादकांचे शिफारसपत्र लाभले आहे.
- ’ह.मो. मराठे यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पुरुष चित्रण : एक आकलन’ या विषयावर शोधप्रबंध लिहून मनीषा बटवाल-कोल्हे यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे.
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |