"वि.स. खांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६६: | ओळ ६६: | ||
* वि.स. खांडेकर हे [[सोलापूर]]ला १९४१ साली भरलेल्या [[मराठी साहित्य संंमेलन]]ाचे अध्यक्ष होते. |
* वि.स. खांडेकर हे [[सोलापूर]]ला १९४१ साली भरलेल्या [[मराठी साहित्य संंमेलन]]ाचे अध्यक्ष होते. |
||
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९६०) - [[ययाति (कादंबरी)]] |
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९६०) - [[ययाति (कादंबरी)]] |
||
* पद्मभूषण पुरस्कार (१९६८) |
|||
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (१९७४) - [[ययाति (कादंबरी)|ययाति कादंबरीसाठी]] |
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (१९७४) - [[ययाति (कादंबरी)|ययाति कादंबरीसाठी]] |
||
* कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. |
|||
== बाह्यदुवे == |
== बाह्यदुवे == |
१९:१३, ३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
वि.स. खांडेकर | |
---|---|
विष्णू सखाराम खांडेकर | |
जन्म नाव | विष्णू सखाराम खांडेकर |
जन्म | जानेवारी १९, १८८९ |
मृत्यू | सप्टेंबर २, १९७६ |
कार्यक्षेत्र | कादंबरीकार |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | ययाति |
वडील | सखाराम खांडेकर |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार (ययाति १९७४ ) |
विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी १९, १८८९ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.
पूर्वायुष्य
- वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला.
रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य
- इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
- तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
- आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
खांडेकर लिखित पुस्तके
- अमृतवेल
- अश्रू
- उल्का ( १९३४ )
- कांचनमृग ( १९३१ )
- क्रौंचवध ( १९४२ )
- जळलेला मोहर ( १९४७ )
- जीवनशिल्पी
- दोन ध्रुव ( १९३४ )
- दोन मने ( १९३८ )
- पहिले प्रेम ( १९४० )
- पांढरे ढग ( १९४९ )
- ययाति
- रिकामा देव्हारा ( १९३९ )
- समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
- साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
- सुखाचा शोध
- सोनेरी स्वप्ने भंगलेली
- हिरवा चाफा ( १९३८ )
- हृदयाची हाक ( १९३० )
पुरस्कार आणि सन्मान
- वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.
- साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)
- पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
- ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी
- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली.
बाह्यदुवे