Jump to content

"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
डॉ. '''आ.ह. साळुंखे''' (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत. ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे विभागप्रमुख होते.
डॉ. '''आ.ह. साळुंखे''' (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत. ते लातूर जिल्ह्यातील धर्माबादच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे फॅकल्टी डीन व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.

१९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्यासुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.

१०:५५, १४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये

डॉ. आ.ह. साळुंखे (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते लातूर जिल्ह्यातील धर्माबादच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे फॅकल्टी डीन व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.

१९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्यासुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.

४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जीवन

डॉ. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली. एम.ए.मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची पीएच.डी.ही संस्कृत विषयातआहे.

वैयक्तिक

  • आ.ह. साळुंखे यांच्या पत्नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
  • आ.ह.साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
  • दुसरे चिरंजीव राकेश यांची लोकायत ही प्रकाशनसंस्था, आ.ह. साळुंखे यांची पुस्तके प्रकाशित करते.

आ.ह. साळुंखे यांची पुस्तके

  • अंधाराचे बुरूज ढासळले
  • अशीच भेटत रहा तू
  • आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
  • आस्तिकशिरोमणी चार्वाक
  • ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
  • गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
  • चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
  • चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
  • तथागत बुद्ध आणि तुकाराम
  • तुकारामांचा शेतकरी
  • तुझ्यासह, तुझ्याविना
  • तुळशीचे लग्न- एक समीक्षा
  • त्यांना सावलीत वाढवू नका !
  • धर्म की धर्मापलीकडे ?
  • परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे ?
  • परिवर्तन : शास्त्रही, कलाही
  • बळीवंश
  • बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
  • मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
  • महात्मा फुले आणि धर्म
  • महाभारतातील स्त्रिया भाग १
  • महाभारतातील स्त्रिया भाग २
  • मित्रांना शत्रू करू नका
  • वादांचीवादळे
  • विद्रोही तुकाराम
  • विद्रोही तुकाराम- समीक्षेची समीक्षा
  • वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (हे पुस्तक http://drahsalunkhe.wordpress.com/audio-book/ इथे ऑडियो सी.डी. स्वरूपात आहे. माहिती sssume@gmail.com येथे मिळेल).
  • वैदिक धर्मसूत्रे तथा बहुजनोंकी गुलामगिरी (हिंदी)
  • शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
  • शिवराय : संस्कार आणि शिक्षण
  • सर्वोत्तम भूमिपत्र : आक्षेप
  • सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध
  • संवाद सहृदय श्रोत्यांशी
  • हिंदू संस्कृती आणि स्त्री

इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद

  • नागार्जुन
  • शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा
  • स्वातंत्र्याचे भय

पुरस्कार, मानसन्मान, भेटवस्तू वगैरे

  • ७ फेब्रुवारी १९९९ रोजी बाबूराव बागूल यांच्या संमेलनाध्यक्षपदी मुबईत धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक
  • रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान(वाई)चा महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार (१०-४-१९९९)
  • सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेल्या मारुती व्हॅनची भेट (१४-१०-१९९९). (या गाडीने डॉ. आ. ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याच्या निमित्ताने २० वर्षांत ४० हजार किलोमीटर प्रवास केला.)
  • २४-२५ एप्रिल१९९९ या काळात जळगाव येथे गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक.
  • १७-१९ डिसेंबर १९९९ या काळात आयोजित केलेल्या ’संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील विचारवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ८-९ जुलै २००० या काळात मराठा सेवा संघाने अमरावती येथे आयोजित केलेल्या पहिल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
  • मारवाडी फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
  • बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथे २४ नोव्हेंबर २०१२रोजी झालेल्या पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे होणाऱ्या ३ऱ्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष.
  • १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

बाह्य दुवे