Jump to content

परिवर्तन साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.



२ रे परिवर्तनशिल साहित्य संमेलन

[संपादन]

येरंडीच्या वतीने परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले होते. संमेलनाध्यक्ष लेखक व गायक अनिरुद्ध वनकरहे होते संमेलनाचे उदघाटन अभियंता मोरेश्‍वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नंदागवळी, उदय चक्रधर, संजय ठवरे, दिलवर रामटेके, एकनाथ नंदागवळी उपस्थित होते. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुन्नाभाई नंदागवळीने यावेळी मार्गदर्शन करताना साहित्य कसे असले पाहिजे, निर्भीड असले पाहिजे असे सांगितले. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील परिवर्तन साहित्य संमेलनाचे गायक व कवी अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते कवींचा व गायकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. साहित्यिकांना व गायकांना शासनाकडून मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी खेमराज भोयर यांनी केले संमेलनाला कवयित्री रझिया पठाण, कांदबरीकारअनंता सूर, खेमचंद रंगारी, कवी भीमानंद मेश्राम, गणेश सांगोडकर यांनी त्यांच्या एकापेक्षा एक चांगल्या कविता सादर केल्या. सर्व कवींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

चौथ्या टप्प्यामध्ये कैलाश बोरकर यांच्या एक रात्र ’निळ्या नभाखाली’ या कार्यक्रमातर्गंत वैदर्भीय गायक कैलास बोरकर, सौ. सुलभा खोब्रागडे यांनी यावेळी अनेक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता सरपंच लीला लोथे, तंटामुक्त अध्यक्ष मनोहर लोथे, सिद्धार्थ उके, शैलेश मोटघरे, आनंद बौद्ध, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. "