शेतकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


व्याख्या[संपादन]

"शेतकरी" एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात राबते. वर्गवेगळ्या हंगामा मध्ये वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकते, अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी. == इतिहास:- शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज [आदिमानव] यांच्या विचारातून व युक्ती तुन या संकपलनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी [बळीराजा] प्रार्थना केली जायची, 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असा आवाज घराघरातून ऐकू यायचा.

भारतीय शेतकऱ्यांच्या मूलभूत गोष्टी:- शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" शेती(जमीन) जिला तो "काळी आई" असं सुद्धा संबोधतो. दुसरं म्हणजे "पाणी"..! कारण शेतीला मुबलक पाणी असेल तरचं शेती करणे शक्य आहे. तिसरं म्हणजे "मनुष्यबळ" ज्यामुळे तो शेतातील पिकांची निगा करू शकतो. चौथे म्हणजे "पैसा" (भांडवल) शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी आणि शेवटी "बाजार पेठ" ज्यात तो आपला पिकवलेला शेतमाल विकतो. शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगात वावरणारे लोकं कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. पण त्याची कोणालाच जाण नसते.

भारतीय शेतकऱ्यावर येणारी संकटे:- शेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही. शेती करतांना अनेक अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो, ज्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांला शेतकरी प्रत्येक वेळेस सामोरे जातो असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो लाखो पैसे खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळं मिळतेच असे नाही.