Jump to content

राळेगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राळेगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

राळेगांव विधानसभा मतदारसंघ - ७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राळेगाव मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. बाभुळगाव, २. कळंब आणि ३. राळेगाव ही तालुके आणि ४. केळापूर तालुक्यातील रुंझा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय जनता पक्षाचे अशोक रामाजी उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

राळेगाव विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • बाभुळगाव तालुका
  • कळंब तालुका
  • राळेगाव तालुका
  • केळापूर तालुका : रुंझा महसूल मंडळ

राळेगाव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९६७ पूर्वी: वणी विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६७ एम.एन. भालवी अपक्ष
१९७२ आनंदराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ सुधाकर बकराम धुर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ गुलाबराव बाजीराव उईके
१९९० नेताजी तनबाजी राजगडकर जनता दल
१९९५ प्रा. वसंत चिंधुजी पुर्के भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९
२०१४ अशोक रामाजी उईके भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राळेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).