Jump to content

जनता दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
জনতা দল; Janata Dal; ג'נטה דאל; जनता दल; ジャナタ・ダル; Janata Dal; Джаната дал; Джаната дал; जनता दल; Janata Dal; ଜନତା ଦଳ; Janata Dal; Ջանատա Դալ; 人民平台; Janata Dal; జనతా దళ్; جنتا دل; Janata Dal; ജനതാ ദൾ; Janata Dal; Janata Dal; Janata Dal; Janata Dal; 人民平臺; जनता दल; ಜನತಾ ದಳ; Janata Dal; Janata Dal; جاناتا دال; 人民平台; ஜனதா தளம்; ভারতের রাজনৈতিক দল; parti politique indien fondé en 1988; ભારતના રાજકીય પક્ષ; भारतातील एक राजकीय पक्ष; Partei in Indien; ଭାରତର ଏକ ରାଜେନୈତିକ ଦଳ; tidligere parti i Indien; بھارتی سیاسی جماعت; partai politik di India; מפלגה בהודו; politieke partij uit India; भारतस्य एकः राजकीय पक्षः; यह भारत का एक राजनैतिक दल है।; భారతదేశానికి చెందిన రాజకీయ పార్టీ; インドの政党; political party in India, 1988–1999; حزب سياسي في الهند; ಬಾರತದ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಶ; இந்திய அரசியல் கட்சி; 贾纳塔达尔党
जनता दल 
भारतातील एक राजकीय पक्ष
Janata Dals partisymbol mellom 1987 og 2003
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
संस्थापक
स्थापना
  • इ.स. १९८८
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
  • इ.स. १९९८
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

जनता दल हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.

इतिहास

[संपादन]
  • भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष (Socialist Party) नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता.
    • (बाकीचे पक्ष:- काँग्रेस, हिंदु-महासभा, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग.)

पुढे या पक्षाचे अनेक तुकडे झाले.

  • जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष.
    • भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या या Socialist पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला.

जनता दल: स्थापना

[संपादन]

या पक्षात उत्तर प्रदेशचे चंद्रशेखर, हरियाणाचे देवीलाल आदी तत्कालीन बडे नेतेही सामील झाले.

  • सन १९८९ च्या निवडणुकांत या पक्षाला लोकसभेत १४२ जागा मिळाल्या आणि त्यांच्या पक्षाचे सरकार बनले.

परंतु, ११ महिन्यांत संपुष्टात आले.

पुढे पंतप्रधान कोण होणार?, या मुद्द्यावर हा पक्ष फुटला.

पक्षाची फाटाफूटी

[संपादन]
  • सन १९९० : चंद्रशेखर, देवीलाल आणि मुलायम सिंह यादव जनता दलातून बाहेर पडले व त्यांनी पूर्वीच्या समाजवादी पक्ष नावाचा राजकीय पक्ष पुनरुज्जीवित केला.
  • सन १९९२ : समाजवादी पक्षातून मुलायम सिंह बाहेर पडले आणि त्यांनी एकट्याच्या जिवावर समाजवादी जनता पक्ष नावाची पार्टी काढली.
  • सन १९९२ : (मुख्य) जनता दलातून अजित सिंह बाहेर पडले आणि त्यांनी परत एकदा लोकदल याच वडीलांच्या पक्षाची पूनर्रुज्जीवन केले.

सन १९९४ : नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी मिळून 'राष्ट्रीय लोकदला'ची स्थापना केली. या राजकीय पक्षाचे नाव पुढे बदलले आणि समता पक्ष झाले.

सन १९९६ : चंद्रशेखरांच्या 'समाजवादी पक्षा'तून देवीलाल बाहेर पडले आणि त्यांनी 'हरियाणा लोकदल (राष्ट्रीय)' नावाचा पक्ष स्थापन केला.

सन १९९७ : चारा घोटाळ्यानंतर लालूप्रसाद यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरले आणि त्यांनी रातोरात 'राष्ट्रीय जनता दल' नावाचा नवा राजकीय पक्ष काढून, आपली पत्नी राबडीदेवी हिला बिहारचे मुख्यमंत्री केले.

सन १९९७ : ओरिसाच्या नवीन पटनाईक यांनी जनता पक्षातून फारकत घेतली आणि 'बिजू जनता दल' नावाचा पक्ष स्थापन केला, आणि ओरिसात सत्ता काबीज केली.

सन १९९९ : शरद यादव यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी 'जनता दल (संयुक्त)' नावाचा राजकीय पक्ष स्थापला. नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस त्यांना मिळाले

सन १९९९ : कर्नाटकातले प्रभावशाली नेता रामकृष्ण हेगडे यांनी 'लोकशक्ति पार्टी' बनवली. पुढे हा पक्ष 'जनता दल युनायटेड'मध्ये समाविष्ट झाला.

सन १९९९ : एकेकाळी पंतप्रधान असलेले एचडी देवेगौडा यांनी जनता पक्षातून बाहेर पडून 'जनता दल (सेक्युलर)' नावाचा पक्ष बनवला आणि सत्ता मिळवली.

सन २००० : 'जनता दल (युनायटेड)'मधून वेगळे झालेले रामविलास पासवान यांनी 'लोक जनशक्ति पार्टी' (LJP) स्थापली.

सन २०१७ : नीतीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी सख्य केल्यानंतर शरद यादव आणि ते त्यांचा जनता दल (युनायटेड) फुटण्याच्या मार्गावर आहे. शरद यादवांना खासदार पदावरून उपराष्ट्रपति यांनी अपात्र केले.

सन २०२१ : रामविलास पासवान यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पक्षामध्ये मुलगा व भाऊ यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत पक्षाची दोन शकले पडली व अधिकृत चिन्ह गोठविलेल्या गेले. RJP(रामविलास) हे मुलगा चिराग पासवान यांचा तर मूळ पक्ष भावाच्या ताब्यात गेला.

हे सुद्धा पहा

[संपादन]