परळी विधानसभा मतदारसंघ
Appearance
परळी विधानसभा मतदारसंघ - २३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. परळी हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] हा मतदारसंघ इ.स. २००९ साली अस्तित्वात आला. त्याआधी याचा बहुतांश भाग रेणापुर विधानसभा मतदारसंघत मोडत असे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय पंडितराव मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | धनंजय पंडितराव मुंडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | पंकजा गोपीनाथराव मुंडे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | पंकजा गोपीनाथराव मुंडे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
परळी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
पंकजा गोपीनाथ मुंडे | भाजप | ९६,२२२ |
त्रिंबक पाटलोबा मुंडे | काँग्रेस | ६०,१६० |
संजय संतराम वाव्हळे | बसपा | ३,६६२ |
माधव लिंबराव जाधव | शिपा | १,९१५ |
शेख लाल शेख मिस्किन | अपक्ष | १,६८३ |
रामराव शेशेराव नागरगोजे | रिपाई (A) | १,१४४ |
दत्ता किसनराव दहिवळ | अपक्ष | ८१६ |
बाजीराव शंकर काळे | अपक्ष | ८०० |
सुशमा दगडू अंधारे | अपक्ष | ४४९ |
संजय नाज्ञानोबा रोडे | प्ररिप | ३२५ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |