Jump to content

आनंद यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आनंद रतन यादव या पानावरून पुनर्निर्देशित)


आनंद यादव
जन्म नाव आनंद रतन यादव
जन्म ३० नोव्हेंबर, १९३५
कागल, कोल्हापूर
मृत्यू २७ नोव्हेंबर, २०१६ (वय ८०)
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती झोंबी

आनंद यादव (३० नोव्हेंबर, १९३५ - २७ नोव्हेंबर, २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले[ संदर्भ हवा ]

जीवन

[संपादन]

आनंद यादव यांनी कोल्हापूरपुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.[ संदर्भ हवा ] लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता.[ संदर्भ हवा ]

यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरीकार होते.[ संदर्भ हवा ]

आनंद यादवांच्या कन्या डाॅ. कीर्ती मुळीक ह्याही लेखिका आहेत.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

[संपादन]

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी इ.स. १९९०मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला[ संदर्भ हवा ].

संतसूर्य तुकाराम

[संपादन]

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरदेखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.[ संदर्भ हवा ]

वारकऱ्यांनी आनंद यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. आनंद यादव, पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक यांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली. यादव मृत्यूपर्यंत जामिनावर होते.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

[संपादन]

आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले काही साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह[ संदर्भ हवा ]

[संपादन]

कथासंग्रह[ संदर्भ हवा ]

[संपादन]

व्यक्तिचित्रे[ संदर्भ हवा ]

[संपादन]

ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ[ संदर्भ हवा ]

[संपादन]
  • आत्मचरित्र मीमांसा
  • १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
  • ग्रामसंस्कृती
  • ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव
  • ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या
  • पाणभवरे (१९८२)
  • मराठी लघुनिबंधाचा इतिहास
  • मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
  • साहित्याची निर्मिति प्रक्रिया
  • साहित्यिक जडण - घडण
  • साहित्यिकाचा गाव
  • स्पर्शकमळे (१९७८)

कादंबऱ्या[ संदर्भ हवा ]

[संपादन]

आत्मचरित्रात्मक[ संदर्भ हवा ]

[संपादन]

बालसाहित्य[ संदर्भ हवा ]

[संपादन]
  • उगवती मने
  • सैनिकहो तुमच्यासाठी

संदर्भ

[संपादन]