समरसता साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सामाजिक व साहित्यिक बांधीलकी मानणारी, आणि समाज जागरणाचे काम सातत्याने करणारी समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा, ही संमेलने दर वर्षी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून भरवते. या संमेलनाचे नाव कधीकधी ’समरसता संत साहित्य संमेलन’ असे असते. याशिवाय, विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन नावाचेही एक संमेलन असते.

यापूर्वीची समरसता साहित्य संमेलने[संपादन]

 • १ले : जळगाव, १९९८, संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव
 • २रे : संमेलनाध्यक्ष डॉ.प्रभाकर मांडे
 • ३रे : संमेलनाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण कवठेकर
 • ४थे : संमेलनाध्यक्ष डॉ.अनंतराव तोरो
 • ५वे : संमेलनाध्यक्ष डॉ.प्रभा गणोरकर
 • ६वे : संमेलनाध्यक्ष डॉ. विश्वास पाटील
 • ७वे : संमेलनाध्यक्ष राजा जाधव
 • ८वे : संमेलनाध्यक्ष डॉ.भीमराव गस्ती
 • ९वे : संमेलनाध्यक्ष मुझफ्फर हुसेन
 • १०वे : चिपळूण, १२ जुलै २००७, संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक कामत
 • ११वे : संमेलनाध्यक्ष भानू काळे
 • १२वे : अंबाजोगाई (बीड जिल्हा), दि. ८, ९, व १० जानेवारी २०१०ला, संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे
 • १३वे : नाशिक, ७-९ जानेवारी २०१०, संमेलनाध्यक्ष उत्तम बंडू तुपे
 • १४वे : चेंबूर(मुंबई), २०-२२ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष मधू जामकर
 • १५वे : जुन्नर(पुणे जिल्हा), ९-१० फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मणराव ढवळू टोपले
 • १६वे : लातूरला, ९-१० फेब्रुवारी २०१४ला. संमेलनाध्यक्ष : शेषराव मोरे
 • १७वे : कल्याणला, ३०-३१ जानेवारी २०१६; अध्यक्ष साप्ताहिक विवेकचे प्रमुख रमेश पतंगे
 • १८वे : नाशिकला ९-ते १० डिसेंबर २०१७; अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे

विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन[संपादन]

 • चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..
 • पिंपरी-चिंचवडच्या समरसता साहित्य परिषदेने भरविलेले ६वे विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन, चिंचवड येथे ११ जानेवारी २०१४ला झाले. साहित्यिक सुरेश कोकीळ हे संमेलनाध्यक्ष होते.
 • ७वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन, चिंचवड, २४ फेब्रुवारी २०१५. संमेलनाध्यक्ष मनोहर सोनवणे.
 • २०१७ साली ज्यावेळी डोंबिवलीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या सुमारास कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलनही पार पडले. या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे होते. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.

१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा. ८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.

या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.

 • ९वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन चिंचवड येथे २३-१-२०१८ रोजी झाले. साहित्यिक प्रा. नरेंद्र नायडू अध्यक्षस्थानी होते.


पहा : मराठी साहित्य संमेलने