"लक्ष्मण माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
==मानसन्मान== |
==मानसन्मान== |
||
* संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन |
* संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७) |
||
* संमेलनाध्यक्ष : |
* संमेलनाध्यक्ष : आदिवासी साहित्य संमेलन (१९८९) |
||
* संमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१) |
|||
* संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१० |
* संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१० |
||
१५:००, १६ मे २०१८ ची आवृत्ती
लक्ष्मण माने | |
---|---|
जन्म | जून १, इ.स. १९४९ |
शिक्षण | बी.ए. |
धर्म | बौद्ध धर्म |
कार्यक्षेत्र | लेखन, सामाजिक कार्य |
वडील | बापू माने |
पत्नी | शशी माने |
अपत्ये | भाईशैलेंद्र (मुलगा) व समता (मुलगी) |
लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, इ.स. १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार लेखनातून ते व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.
जीवन
लक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमानथळी (फालटन, महाराष्ट्र) या लहान गावातील एका कैकाडी समाजात झाला. त्यांना भाईशैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. मानेंनी इ.स. २००६ च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. लक्ष्मण माने यांनी शेवटी २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.
कारकीर्द
मानसन्मान
- संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७)
- संमेलनाध्यक्ष : आदिवासी साहित्य संमेलन (१९८९)
- संमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१)
- संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०
आरोप व खंडन
सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील आश्रमशाळेत स्वयंपाकी महिलेवर यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावरती आनंद देशमुख, अस्लम जमादार, सलीमा मुल्ला, विजय कदम या त्यांच्याच आश्रमशाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुभांड रचून त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने या महिलांना हाताशी धरून असे खोटे गुन्हे दाखल केले असे १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सिद्ध झाले. यांपैकी एकाही आरोपात तथ्य नसल्याने लक्ष्मण माने यांना न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे.[१][२]
पुस्तके
- उद्ध्वस्त
- उपरा (आत्मकथन)
- क्रांतिपथ (कवितासंग्रह)
- खेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)
- पालावरचं जग (लेखसंग्रह)
- प्रकाशपुत्र (नाटक)
- बंद दरवाजा (लेखसंग्रह)
- भटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)
- विमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)
पुरस्कार
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |