Jump to content

"गंगाधर पानतावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४७: ओळ ४७:
* अंकुशराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंतांना, मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांच्या द्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार डॉ.गंगाधर पानतावणे यांना १८ सप्टेंबर २०११ रोजी देण्यात आला.
* अंकुशराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंतांना, मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांच्या द्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार डॉ.गंगाधर पानतावणे यांना १८ सप्टेंबर २०११ रोजी देण्यात आला.
* [[वाई]] येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार' (इ.स. २००६)
* [[वाई]] येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार' (इ.स. २००६)
* २०१८ सालचा [[पद्मश्री पुरस्कार]]<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/dr-gangadhar-pantawane/articleshow/62762729.cms|title=dr.gangadhar pantawane {{!}} गंगाधर पानतावणे - Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-03-27|language=mr}}</ref>
* २०१८ सालचा [[पद्मश्री पुरस्कार]]<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/dr-gangadhar-pantawane/articleshow/62762729.cms|title=dr.gangadhar pantawane {{!}} गंगाधर पानतावणे - Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-03-27|language=mr}}</ref> :{ 'पद्मश्री' स्वीकारण्यासाठी जाता आले नाही
डॉ. पानतावणे हे आजारामुळे रुग्णालयात दाखल होते तेव्हा २६ जानेवारी २०१८ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले. २० मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे पानतावणेकरांना व्यक्तिश: पुरस्कार स्वीकारण्यास हजर राहता आले नाही.


==संदर्भ==
==संदर्भ==

१७:०७, २७ मार्च २०१८ ची आवृत्ती

चित्र:Gangadhar-pantavane.jpg
गंगाधर पानतावणे

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (जून २८, इ.स. १९३७ - २७ मार्च इ.स. २०१८) हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व दलित साहित्याचे जनक होते. पानतावणे हे अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

गंगाधर पानतावणे हे मूळचे नागपूर, विदर्भातले होते. २८ जून १९३७ रोजी नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. आणि एम.ए. ची पदवी मिळवली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.[] तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी १९८७ साली पी.एच.डी. ची पदवीही मिळवली. पी.एच.डी. साठी त्यांनी भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर शोध प्रबंध लिहिला. त्यानंतर याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.[]

कारकीर्द

इ.स. १९६३ मध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. आणि तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली, ज्याला तरुण आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला. ‘‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’’ अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करत पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी ५० वर्षांपर्यंत कार्य केले आहे. या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले आहेत. दलित लेखक-वाचक मेळावा भरवला.

सॅनहोजे (अमेरिका) येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन (आनंदवन वरोरा), मराठवाडा साहित्य संमेलन (परभणी), या व इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते.

साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण २० वैचारिक व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. याखेरीज १२ पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांची लेखणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज ह्यांच्या विचारधारेतून निर्माण झाली आहे.

भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य, समाज तथा संस्कृतिविषयक अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केलेले आहे. मराठी भाषेतील व साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्थांचे ग्रंथपुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले आहेत. पुणे, वाई, नाशिक येथील प्रतिष्ठीत 'वसंत व्याख्यानमाला' तथा महाराष्ट्रातील अन्य व्याख्यानमाला तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध व्याख्यानमालेत त्यांनी महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली आहेत. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्तीने सन्मानित केले आहे. तसेच साहित्य अकादमीकडून भारतीय लेखक म्हणून त्यांचा सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना २०१८ सालच्या पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील बौद्ध लेण्यांवरील विशेष यात्रेची सुरुवात केली.

निधन

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णालयात त्यांचे २७ मार्च, २०१८ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.[]

लेखन साहित्य

पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केले आहे.[][]

  • आंबेडकरी जाणीवांची आत्माप्रत्ययी कविता (गोदा प्रकाशन)
  • साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती (स्वरूप प्रकाशन)
  • अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा)
  • चैत्य
  • दलित वैचारिक वाङ्मय (समीक्षा)
  • दुसऱ्या पिढीचे मनोगत
  • पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रतिमा प्रकाशन)
  • लेणी (व्यक्तिचित्रे, प्रतिमा प्रकाशन)
  • वादळाचे वंशज
  • विद्रोहाचे पाणी पेटले आहे
  • स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे, सुविद्या प्रकाशन)

संपादन

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख (प्रतिमा प्रकाशन)
  • अस्मितादर्श

पुरस्कार व सन्मान

  • मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांचा 'मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार'
  • २००६ मध्ये वाई येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार'[]
  • फडकुले पुरस्कार[]
  • पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सान होजे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. इ.स. २००९[]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, २०१६[]
  • अंकुशराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंतांना, मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांच्या द्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार डॉ.गंगाधर पानतावणे यांना १८ सप्टेंबर २०११ रोजी देण्यात आला.
  • वाई येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार' (इ.स. २००६)
  • २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार[१०] :{ 'पद्मश्री' स्वीकारण्यासाठी जाता आले नाही

डॉ. पानतावणे हे आजारामुळे रुग्णालयात दाखल होते तेव्हा २६ जानेवारी २०१८ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले. २० मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे पानतावणेकरांना व्यक्तिश: पुरस्कार स्वीकारण्यास हजर राहता आले नाही.

संदर्भ

  1. ^ https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=
  2. ^ http://www.esakal.com/maharashtra/writer-dr-gangadhar-pantawane-passed-away-aurangabad-105609
  3. ^ "veteran marathi literature gangadhar pantawane passes away | डॉ. गंगाधर पानतावणे यांचं निधन - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ http://abpmajha.abplive.in/maharashtra/veteran-marathi-literature-gangadhar-pantawane-passes-away-525668
  5. ^ http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4829624712770247086
  6. ^ https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=
  7. ^ https://m.maharashtratimes.com/-/articleshow/3199734.cms
  8. ^ "डाॅ. गंगाधर पानतावणे, बंग दांपत्यासह महाराष्ट्रातील 11 मान्यवरांना पद्म सन्मान". marathibhaskar. 2018-01-26. 2018-03-27 रोजी पाहिले.
  9. ^ "Nagpur Gangadhar Pantawane felicitated | बाबासाहेबांना हवे होते त्रिभाजन - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.
  10. ^ "dr.gangadhar pantawane | गंगाधर पानतावणे - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे