"श्रीधर व्यंकटेश केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3632652 |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==ग्रंथसंपदा== |
==ग्रंथसंपदा== |
||
‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या त्यांच्या पुस्तकातील समाजशास्त्रीय विवेचन हे |
* ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ (या त्यांच्या पुस्तकातील समाजशास्त्रीय विवेचन हे पाश्चात्त्य जगातही मान्यता पावलेले आहे.) |
||
* कादंबऱ्या |
|||
** आशावादी (१९३७) |
|||
** गांवसासू(१९४२) |
|||
** गोंडवनातील प्रियंवदा |
|||
** परागंदा (१९२६) |
|||
** ब्राह्मणकन्या (१९३०) |
|||
** भटक्या (१९३८) |
|||
** विचक्षणा (१९३७) |
|||
* साहित्यविषयक |
|||
** महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण |
|||
== संकीर्ण == |
== संकीर्ण == |
१६:२८, ६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास-संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
सुरुवातीचे जीवन
केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी, इ.स. १८८४ रोजी ब्रिटिश भारतात रायपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कार्य
इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतिशब्द बनवला [१]. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले [१].
ग्रंथसंपदा
- ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ (या त्यांच्या पुस्तकातील समाजशास्त्रीय विवेचन हे पाश्चात्त्य जगातही मान्यता पावलेले आहे.)
- कादंबऱ्या
- आशावादी (१९३७)
- गांवसासू(१९४२)
- गोंडवनातील प्रियंवदा
- परागंदा (१९२६)
- ब्राह्मणकन्या (१९३०)
- भटक्या (१९३८)
- विचक्षणा (१९३७)
- साहित्यविषयक
- महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण
संकीर्ण
स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले. ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते. इ.स. १९३१ सालातल्या हैदराबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे, श्रीधर व्यंकटेश केतकर हे अध्यक्ष होते. ‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले.
संदर्भ व नोंदी
- ^ a b श्री.के. क्षीरसागर. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205104:2012-01-13-09-15-34&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117. १६ जानेवारी, इ.स.२०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- श्री.के. क्षीरसागर. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205104:2012-01-13-09-15-34&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117. १६ जानेवारी, इ.स.२०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - डॉ. मीना वैशंपायन . http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237953:2012-07-14-12-49-58&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117. १५ जुलै २०१2 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |