सावंतवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  ?सावंतवाडी

महाराष्ट्र • भारत
—  शहर, नगर  —
Map

१६° ००′ ००″ N, ७३° ४५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या २२,८६१ (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६५१०
• +०२३६३
• महा.-०७

सावंतवाडी (मालवणी/कोकणी: वाडी) हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्हातील तालुक्याचे ठिकाण आहे. सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पुर्वीच्या 'सावंतवाडी संस्थानाचे' राजधानीचे शहर होते.[१]

सावंतवाडी इथल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चितारआळीत अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात. येथील निसर्गरम्य वातावरणामूळे हे आता पर्यटकांचे आक‍‍र्षणाचे केंद्र बनत चालले आहे.मोती तलाव (बोटींग सुविधा), आत्मेश्वर तळी(भरती ओहटी),नरेंद डोंगर, हनुमान मंदिर, राजवाडा, भोसले उद्यान, शिल्पग्राम,पर्यटन स्थळे आहेत. भालेकर खानावळ,बांदेकर खानावळ,आरेकर खानावळ, हॉटेल चैतन्य, हॉटेल दळवी,लाड खानावळ, ही मच्छी,मटणसाठी सुप्रसिद्ध हॉटेल असून शुद्ध शाकाहारी साठी साधलेमेस,विसावा, रेणुका ही हॉटेल सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक मॉर्डन रेस्टॉरंट उपलब्ध आहेत.हॉटेल मेंगो, पर्ल,लेक व्यू,पॉम्पस, रेणुका, तारा, सेव्हन हिल्स,आदि अनेक हॉटेल राहण्यास उपलब्ध.

इतिहास[संपादन]

सावंतवाडी ही स्वातंत्र्यपूर्वकाळातील् 'सावंतवाडी संस्थानाची' राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. येथे सावंत घराण्याची सत्ता होती. इ.स. १९४७ साली, ते भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाले. एके काळी (१८ व्या शतकापर्यंत) सावंतवाडी संस्थान आजच्या उत्तर गोव्यापसून (पेडणे, डिचोली, सत्तारी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि वेंगुर्लापासून पसरले होते. पेडणे, डिचोली, सत्तारी हे भाग नंतर पोर्तुगीजांनी आपल्या नव्या साम्राज्याला जोडले (१७६५-१७८८ दरम्यान) आणि पुढे जुन्या साम्राज्यात त्याचा विलय करून आजचे गोवा उदयास आले. येथील बहुतेक लोक मराठा, भंडारी आणि [[हरिजन समाज]वैश्य,]ातील आहेत.तसेच ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर आहे. शहराला इतिहास काळापासून गुरुत्वाकर्षण द्वारे केसरी गावातून पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय पाळणेकोंड धरण आहे Even since the establishment of order under the ब्रिटीश, सावंतवाडी has more than once been the scene of revolt and disturbance. But now for nearly thirty-five years peace has been unbroken and the old pirate and freebooting classes have settled as quiet husbandmen. The only remaining signs of special enterprise and vigour were, till a few years ago, their readiness to cross the समुद्र to Mauritius in search of work, and the fondness that still remains for military and पोलीस सेवा

लोकजीवन[संपादन]

इ.स. २००१च्या भारतीय जणगणनाप्रमाणे सावंतवाडीची लोकसंख्या २२८७१ होती. यात पुरूष व स्त्रीयांचे प्रमाण प्रत्त्येकी ५० टक्के होते. सावंतवाडीतील साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्के असून ते राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा (५९.५%) जास्त आहे. यातील पुरूष साक्षरतेचा दर ८५% असून ७९% स्त्रीया साक्षर आहेत. सावंतवाडीतील १० टक्के लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे. येथील लोकं प्रामुख्याने मराठीमालवणी भाषा बोलतात. भात, सोलकडी, ताक तसेच मासे, मटण, अंडी इत्यादी येथील प्रमुख अन्नपदार्थ आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.याशिवाय स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अँक्सीस,सारस्वत, कँनरा,सिंडीकेट,बँक ऑफ बडोदा,सावंतवाडी अर्बन,कँथलिक अर्बन,फेडरल,युको,सिंधुदुर्ग जिल्हा बँक,आदि बँक कार्यरत आहेत. सावंतवाडी बस स्थानकातून तुळजापूर, पुणे,हुबळी(कर्नाटक),बेळगाव(कर्नाटक),कारवार(कर्नाटक),बैलहोंगल(कर्नाटक),पणजी(गोवा),वास्को(गोवा),मडगाव(गोवा), रत्‍नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, उस्मानाबाद, नरसोबाचीवाडी,औरंगाबाद, चिंचवड, राजापूर, दापोली,गणपतीपुळे, आदि ठिकाणी बस सुटतात, याशिवाय सावंतवाडी रेल्वे स्थानकातून दिल्ली,गांधीनगर, पटना,नागरकोईल,मडगाव, मुंबई, पुणे,कोचीवली,आदि ठिकाणी रेल्वे जातात तसेच दिवा,दादर,मडगाव याठिकाणी येथून रेल्वे सुटतात. चिपी विमानतळ ४०किमी.तर गोवा(मोपा) आंतरराष्ट्रीय विमानतळ १७ किमी अंतरावर आहे.

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

स्रोत व आभार[संपादन]

मुंबईचा हा लेख मूळ इंग्रजी विकिपीडियाच्या [१] या लेखाचे भाषांतर आहे. यातील काही भाग [Ratnagiri and Savantvadi District Gazetteer 1880] मधून भाषांतरित केला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/diwali-news-news/sawantwadi-sansthan-392661/
  2. ^ /https://www.bankofindia.co.in/