पारनेर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

पारनेर | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ११००० २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४८८ |
टपाल संकेतांक | ४१४३०२ |
वाहन संकेतांक | MH-16 |
निर्वाचित प्रमुख | निलेश ज्ञानदेव लंके (आमदार) |
पारनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील एक शहर आहे. प्रख्यात महाकाव्य महाभारत लिहिणाऱ्या महर्षि वेद व्यास यांचे वडील ऋषि पराशर यांच्या येथील वास्तव्यावरून पारनेर हे नाव पडले, असे सांगितले जाते.

पारनेर शहर हे समुद्रसपाटी पासून ६००-७०० मीटर उंचीवर आहे. पारनेर तालुक्यातील काही खेडी अशी आहेत की तेथील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैनिकी किंवा शिक्षकी पेशामध्ये आहे; या कारणास्तव पारनेर गावाला शिक्षकांचे शहर म्हणतात. पारनेर तालुक्यातील हंगा हे गाव छत्रपति शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक (जाधव)यांचेव मुळगाव आहे.