विभागीय साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल भारतीय मराठी साहित्य संघाच्या एखाद्या छोट्या शाखेने आपल्याच विभागापुरत्या भरवलेल्या साहित्य संमेलनास विभागीय साहित्य संमेलन असे म्हणतात. अशी अनेक विभागीय संमेलने जिल्हा पातळीवर किंवा गावाच्या पातळीवर भरतात.

  • १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे.
  • एक विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ) येथे झाले होते. (कधी?)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर २००९ या दिवशी चिंचवड येथे विभागीय साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कवी व गीतकार प्रवीण दवणे होते.
  • पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना कऱ्हाड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूर यांच्या वतीने १३ आणि १४ नोव्हेंबर २०१० या दोन दिवशी सोलापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तत्कालीन केंदीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे होत्या. साहित्य समीक्षक प्रा. निशिकांत ठकार हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे विभागीय साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष मराठी कवी विठ्ठल वाघ होते.
  • दिवंगत कवी भिवराजी आढाव यांच्या स्मृत्यर्थ २६ ऑक्टोबर २०१२ रोजी परतूर येथे मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलन झाले. या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. इंद्रजित भालेराव होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले (?वे). संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले होते.
  • १९-२० जानेवारी २०१३ : विटा (सातारा जिल्हा) येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व महात्मा गांधी विद्यामंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त २१ वे विभागीय साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विटा शाखेचे आयोजन होते. संमेलनाध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले होत्या.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २२ वे विभागीय साहित्य संमेलन आणि दुसरे नाट्य साहित्य संमेलन संयुक्तपणे आयोजित करण्याचा बहुमान म. सा. प.च्या शाहुपुरी शाखेला, स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जन्मवर्षात मिळाला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा.नारायण कुलकर्णी-कवठेकर होते. ही दोन्ही संमेलने शुक्रवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, २४ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सातारा येथे झाली.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विभागीय मराठी साहित्य संमेलन दापोली येथे १९ व २० डिसेंबर २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे होत्या. हे २३वे विभागीय संमेलन होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे भोसरी येथे दोनदिवसीय विभागीय साहित्य संमेलन १-२ डिसेंबर २०१५ या काळात झाले. डॉ. रामचंद्र देखणे संमेलनाध्यक्ष होते. हे २४वे विभागीय संमेलन होते.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाटण शाखेतर्फे पाटण (सातारा जिल्हा) येथे तीन दिवसीय विभागीय साहित्य संमेलन ८-९-१० ऑक्टोबर २०१६ या काळात झाले. डॉ. प्रज्ञा पवार संमेलनाध्यक्ष होत्या.. हे २५वे विभागीय संमेलन होते.
  • पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद व अहमदनगरची सावेडी उपनगर शाखा यांनी आयोजित केलेले विभागीय मराठी साहित्य संमेलन ४ आणि ५ नोव्हेंबर २०१७ या काळात अहमदनगर येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे होते.
  • स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण (सातारा जिल्हा) २-३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ४थे साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सव झाला. ज्येेष्ठ कवी व लेखक प्रा. वैजनाथ महाजन सांगली हे संमेलनाध्यक्ष होते.
  • भडकबाबा पाटणकर यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण (सातारा जिल्हा) २-३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ५वे साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सव झाला.
  • स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण (सातारा जिल्हा) २-३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ६वे साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सव झाला.
  • नांदेड येथे दरवर्षी महिला दिनानिमित्त ८ मार्चला अक्षरोदय साहित्य संमेलन होते. २०२० साली होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षा हिंगोली इथल्या कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी असतील.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन २७ आणि २८ मार्च २०२० या काळात फलटण जि. सातारा येथे झाले. आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने या संमेलनाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.



हे सुद्धा पहा[संपादन]