येवला विधानसभा मतदारसंघ
Appearance
(येवला (विधानसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
येवला विधानसभा मतदारसंघ - ११९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. येवला तालुका, २. निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. येवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन चंद्रकांत भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
येवला मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | छगन चंद्रकांत भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | छगन चंद्रकांत भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | छगन चंद्रकांत भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
येवला | ||
उमेदवार | पक्ष | मत |
छगन भुजबळ | राष्ट्रवादी | १०६,४१६ |
ॲड. माणिकराव माधवराव शिंदे-पाटील | शिवसेना | ५६,२३६ |
पौलास कारभारी अहिरे | बसपा | १,९८४ |
संदीप विश्वनाथ घोडेराव | अपक्ष | १,६४१ |
दिनकर सीताराम डिवर | रिपाई (A) | १,५३८ |
चहाबाई लक्ष्मण अस्वले | अपक्ष | ७३१ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर येवला विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |