नरेंद्र जाधव
नरेंद्र जाधव | |
डॉ. नरेंद्र जाधव | |
जन्म | मे २८, इ.स. १९५३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
निवासस्थान | भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध धर्म |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, लेखक |
प्रशिक्षण | मुंबई विद्यापीठ इंडियाना विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | प्रा. ग्रीन प्रा. फुरस्टनबर्ग |
वडील | दामोदर जाधव |
आई | सोनाबाई जाधव |
पत्नी | वसुंधरा जाधव |
अपत्ये | तन्मय अपूर्वा |
डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.
जीवन
[संपादन]मे २८, इ.स. १९५३ रोजी त्यांचा जन्म एका सामान्य दलित महार कुटुंबात झाला व इ.स. १९५६ मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१] वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’आमचा बाप आन् आम्ही' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीस भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
शिक्षण
[संपादन]जाधवांनी मुंबई विद्यापीठाकडून १९७३ साली संख्याशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (विशेष नैपुण्यासह प्रथम वर्ग) आणि १९८६ अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. या विद्यापीठाकडून 'सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी' हा विशेष बहुमान मिळवला.[२]
कारकीर्द
[संपादन]डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर अँड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
लेखन
[संपादन]नरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत - इंग्रजीमध्ये १९, मराठीत १३, आणि हिंदीमध्ये ३. ३०० पेक्षाही अधिक शोध पेपर आणि लेख. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि रवींद्रनाथ टागोरांवर ३ पुस्तके ज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवडक कविता, लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.
मराठी पुस्तके
[संपादन]- युगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)
- प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र (ग्रंथाली, मुंबई, २०१४)
- प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड १: राजकिय लेखन
- प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
- लसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
- बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची
- बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे
- बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)
- रविंद्रनाथ टागोर: युगनिर्माता विश्वमानव (ग्रंथाली, मुंबई, २०११)
- रविंद्रनाथ टागोर: समग्र साहित्य दर्शन (ग्रंथाली, मुंबई, २०११)
- भयशून्य चित्तजेथ: रविंद्रनाथांच्या १५१ प्रतिनिधीक कविता (ग्रंथाली, मुंबई, २०१०)
- आमचा बाप आन् आम्ही (ग्रंथाली, मुंबई, १९९३) (१९९ वी आवृत्ती)
- डॉ. आंबेडकर: आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान (सुगावा प्रकाशन, पुणे १९९२)
इंग्रजी पुस्तके
[संपादन]- Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar: An Intellectual Colossus, Great National Leader and Universal Champion of Human Rights Photo-Biography (Municipal Corporation of Greater Mumbai, 2016)
- Ambedkar: An Economist Extraordinaire (Konark Publishers, New Delhi, 2015)
- Ambedkar: Awakening India’s Social Conscience (Konark Publishers, New Delhi, 2014)
- Ambedkar Writes: Complete Writings of Dr Ambedkar (Edited) (2014) Vol.I : Political Writings
- Ambedkar Writes: Complete Writings of Dr Ambedkar (Edited) (2014) Vol.II: Scholarly Writings (Sociology, Economics, Anthropology, Law, Constitution and Religion)(Konark Publishers, New Delhi, 2013)
- Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol I: Introduction, Autobiography Speeches, Guidance to Followers and Complete Bibliography
- Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol II: Social, Economic, Religion, Law and Constitution
- Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol III: Political Speeches (Konark Publishers, New Delhi)
- Untouchables: My Family’s Triumphant Journey Out of the Caste System in Modern India (California University Press, USA 2007 and Simon and Schuster, USA)
- Monetary Policy, Financial Stability and Central Banking in India (Macmillan India Ltd, New Delhi, 2006)
- Re-emerging India – A Global Perspective (ICFAI University Press: Hyderabad, 2005)
- Outcaste – A Memoir: Life and Triumphs of an Untouchable Family in India (Penguin, India, 2003)
- Governors Speak (Edited) (Reserve Bank of India, 1997)
- CD Deshmukh Memorial Lectures (Edited) (Reserve Bank of India, 1996)
- Challenges to Indian Banking Competition, Globalization and Financial Markets (Edited) (Macmillan India Ltd, New Delhi, 1996)
- Monetary Economics for India (Macmillan India Ltd, New Delhi, 1994)
- Our Father and Us (Children’s Edition, Korean) (Gimmyoung Publishers, Korea 2009)
- Dr Ambedkar: Economic Thoughts and Philosophy (Popular Prakashan, Mumbai, 1992)
- Macroeconomic Investment Management in LDCs – A Social Cost Benefit Approach (Indiana University, USA, 1986)
हिंदी पुस्तके
[संपादन]- डॉ. आंबेडकर : आत्मकथा एवं जनसंवाद (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
- डॉ. आंबेडकर : सामाजिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
- डॉ. आंबेडकर : आर्थिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
- डॉ. आंबेडकर : राजनिती, धर्म और संविधान विचार (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
- विश्वमानव रबिन्द्रनाथ टागोर (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
संदर्भ
[संपादन]- ^ "अंबेडकर ने मनुष्य के रूप में जीने का हक दिलाया: डॉ जाधव– News18 हिंदी". News18 India. 2018-03-21 रोजी पाहिले.
- ^ नरेंद्र, जाधव. "शिक्षण". http://www.drnarendrajadhav.info/drjadhav-data_files/Education.htm. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- नरेंद्र जाधव यांचे अधिकृत संकेतस्थळ
- तो व्यक्ती ज्याचे पुस्तक २० वर्षानंरतही बेस्ट सेलर बनलेले आहे
- Narendra Jadhav Biography in Marathi - डॉ. नरेंद्र जाधव