Jump to content

प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय (नांदेड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रतिभा निकेतन शिक्षण संस्था, नांदेड ही शिक्षणसंस्था मराठवाडा विभागातील आद्य मराठी शिक्षणसंस्थांपैकी एक आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेची स्थापना झाली. स्वातंत्र्याच्या आकांक्षेने भारावलेल्या शिक्षकांनी[ संदर्भ हवा ] या शाळेची १९४१ साली स्थापना केली. एस. आर. गुरुजी, बाबासाहेब परांजपे, श्यामराव बोधनकर, भाऊशास्त्री देव, भा. रू. गांजवे, देवीदास लव्हेकर, केशवराव नागपूरकर, बालचंदसेठ मुसा, इत्यादी हैदराबाद मुक्तीसंग्रामातील कार्यकर्त्यांनी यास सक्रीय पाठबळ दिले.

नांदेडचे तत्कालीन कवी दे. ल. महाजन, दत्तूसिंग गुरुजी, साधू गुरुजी यांनी १०-१२ विद्यार्थी घेउन शाळेची सुरुवात केली. एकीकडे हैदराबादेच्या निजाम शासनाचा ससेमिरा आणि दुसरीकडे कर्मठ असा तत्कालीन समाज अशा बिकट स्थितीत हैदराबाद पोलीस ऍक्शनपूर्वीचे दिवस या शिक्षणसंस्थाचालकांना काढायला लागले.[ संदर्भ हवा ]

काशिनाथराव मोहरीर, केशवराव लहाने, सीतारामपंत जोशी, खंडेराव गुरुजी, विनायक द. सर्जे, नरहर कुरुंदकर, वसंत गंगाखेडकर, अच्युतराव खोडवे, जीवनराव बोधनकर इत्यादी शिक्षकांनी ही शाळा नावारूपास आणली. हैदराबाद मुक्तीसंग्रामाकरता कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली.[ संदर्भ हवा ] या शाळेने साहित्य, संगीत, नाट्य या क्षेत्रांतही भरीव योगदान केले.

विनायक द. सर्जे यांची संस्थेचे मुख्याध्यापक या नात्याने भूमिका महत्त्वपूर्ण होती. विनायक द.सर्जे हे पुण्याच्या अनाथ वसतीगृहाचे विद्यार्थी होते. काँग्रेससानेगुरुजींच्या विचारांनी भारावलेले ते शिक्षक होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संदर्भ

[संपादन]
  • "समर्पण" लेखसंग्रह: संपादक प्रा. डॉ. ल. का. मोहरीर (इ.स.२००२)