Jump to content

सुमती क्षेत्रमाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुमती क्षेत्रमाडे

डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे' (जन्म : झापडे-लांजा तालुका, ७ मार्च १९१३, - कोल्हापूर, ८ ऑगस्ट १९९८) या व्यवसायाने डॉक्टर असून, मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्या स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल लिहीत असत. त्यांनी मराठी व गुजराती भाषेत विपुल लेखन केले.

जीवन

[संपादन]

१९३५ मध्ये डॉक्टर झाल्यावर सुमती क्षेत्रमाडे यांचे वास्तव्य बडोद्याला होते. इ.स. १९४५ साली जास्तीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या व नंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन त्यांनी वैद्यक व्यवसाय केला. त्यांची पहिली कांदबरी आधार ही दवाखान्यातील वातावरणावर आधारित होती.

युगंधरा

[संपादन]

एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते, अशी उदाहरणे वास्तव जगातही अनेकदा दिसतात. अशी कथा असलेली डॉ. सुमति क्षेत्रमाडे यांची 'युगंधरा' ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. कादंबरीतील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आईबाबांची आवडती लेक आणि दोन भावांची लाडकी बहीण आहे. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा आपल्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते. त्यांचे जीवन उभारताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. दुसऱ्यासाठी झिजतच ती देह ठेवते. युगंधराची ही कहाणी अंतःकरणाला भिडते. स्त्रीची अनेक रूपे युगंधराच्या रूपाने कादंबरीत दिसतात.

सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अग्निदिव्य
  • अनुहार
  • आधार
  • आभास
  • आश्रय (१९७९)
  • आषाढमेघ (१९७६)
  • कळसूत्री बाहुल्या
  • क्रौंचवध (वि.स. खांडेकर यांची याच नावाची एक कादंबरीआहे.)
  • गीता
  • गोबरगंध
  • चतुरा
  • चतुष्कोन
  • जीवनस्वप्न (शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावरील कादंबरी -१९७५)
  • ढगाळलेला चंद्रमा (१९८८)
  • तपस्या
  • दीर्घायुषी व्हायचे आहे?
  • नंदादीप
  • नरसी भगत
  • नल दमयंती
  • ना ऐलना पैल
  • पतिव्रता
  • पांचाली
  • पुनर्जन्म
  • प्रतिपदा (१९८२)
  • प्रीतीचा शोध (१९७८)
  • बंदिनी
  • बाभळीचे काटे
  • मखमली बटवा(१९७९)
  • महाश्वेता (सुधा मूर्ती यांनी याच नावाची आणि याच कथानकाची कादंबरी कानडी भाषेत लिहिली आहे.)
  • मेघमल्हार
  • याज्ञसेनी
  • युगंधरा (१९९०)
  • योगेश्वर श्रीकृष्ण (१९९०)
  • वादळवीज
  • वृंदा
  • व्याधाची चांदणी
  • शकुन
  • शततारका
  • शर्वरी शर्वरी
  • श्रावणधारा (१९८३)
  • श्रीकृष्ण
  • सत्यप्रिय गांधारी
  • समर्पिता
  • सांबराची शिंगे
  • सिंधुदुर्ग
  • सीमारेषा
  • सुमतिगंधा
  • सेला
  • Women Characters in Saratchandra