सुधा मूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुधा कुळकर्णी-मूर्ती
सुधा कुळकर्णी-मूर्ती
जन्म सुधा कुळकर्णी-मूर्ती
१९ ऑगस्ट, इ.स. १९५०
शिगगाव, कर्नाटक.
इतर नावे सुधा मूर्ती
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र सामाजिक कार्य, अभियंत्रिकी, लेखिका.
भाषा मराठी, कन्नड
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६)
वडील रामचंद्र
पती एन.आर. नारायण मूर्ती
अपत्ये रोहन (मुलगा), अक्षता (मुलगी).

सुधा कुळकर्णी-मूर्ती (१९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव, कर्नाटक - हयात) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे (प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी) ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.

पूर्वायुष्य[संपादन]

सुधा मूर्ती या एम.टेक. आहेत. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अस्तित्व
 • आजीच्या पोतडीतील गोष्टी
 • आयुष्याचे धडे गिरवताना
 • द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड हिज गॉड (इंग्रजी)
 • बकुळ
 • गोष्टी माणसांच्ता
 • जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
 • डॉलर बहू (इंग्रजी), (मराठी)
 • तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी)
 • थैलीभर गोष्टी
 • परिधी (कानडी) [1]
 • परीघ (मराठी)
 • पितृऋण
 • पुण्यभूमी भारत
 • द मॅजिक ड्रम अ‍ॅन्ड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
 • महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
 • वाइज अ‍ॅन्ड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
 • सामान्यांतले असामान्य
 • सुकेशिनी
 • हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

साचा:Commmonscat


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.