युसुफखान महंमदखान पठाण
युसुफखान महंमदखान पठाण |
---|
डॉ. युसुफखान महंमदखान पठाण १ मार्च (१९३० - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
शिक्षण
[संपादन]यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले गेले आहे.
अध्यापन
[संपादन]- १९५३-१९५९ : दयानंद महाविद्यालय, सोलापूर
- १९६०-१९९० : तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या (आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) मराठी भाषा व वाड्.मय विभागात प्राध्यापक व १९७३ पासून मराठीचे विभाग प्रमुख कार्य.
त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे.
प्रकाशित साहित्य
[संपादन]मानसन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- इ.स. १९७२ : ’मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ या ग्रंथासाठी राज्यपुरस्कार
- इ.स. १९७२ : अतिथी प्राध्यापक(चेकोस्लाव्हाकिया)
- इ.स. १९७६ : आदर्श शिक्षक(राज्य पुरस्कार)
- इ.स. १९८२ : ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप(लंडन विश्वविद्यालय)
- इ.स. १९८४ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून निवड
- इ.स. १९८४ : ’संतसाहित्य चिंतन’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
- इ.स. १९८८ : सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- १९८८ : अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीची डॉ. आंबेडकर फेलोशिप
- इ.स. १९९० : पुणे येथे झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- १९९०-१९९२ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून मान्यता
- इ.स. १९९२ : कौमी तंजीय हा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
- इ.स. १९९५ : संतसाहित्यविषयक परिवर्तन पुरस्कार
- इ.स. १९९८ : आचार्य अत्रे पुरस्कार
- इ.स. १९९९ : मराठवाडा गौरव पुरस्कार
- इ.स. २००० : पुरोहितस्वामी पुरस्कार
- इ.स. २००० : साहित्य संस्कृति मंडळाची गौरववृत्ती
- इ.स. २००१ : दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनची राष्ट्रीय फेलोशिप
- २००१-०२ : दलितमित्र पुरस्कार
- इ.स. २००२ : देहू संस्थानचा जगद्गुरू पुरस्कार
- इ.स. २००३ : मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
- इ.स. २००४ : डॉ. कपाळे साहित्य पुरस्कार(वीरशैव साहित्य पुरस्कार)
- इ.स. २००७ : भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
- इ.स. २०११ : महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार
- इ.स. २०१३ : दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार.