अल बिरूनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अबु अल-रह्यान मुहम्मद इब्न अहमद अल बिरूनी (४ किंवा ५ सप्टेंबर, इ.स. ९७३ - १३ डिसेंबर, इ.स. १०४८) हा पर्शियन मुस्लिम बहुगुणसंपन्न विद्वान होता.मध्य-इस्लामिक कालखंडातील एक महान विद्वान म्हणून त्याला ओळखल्या जायचे. तो भौतिकशास्त्र,गणित,भविष्यवेत्ता,नैसर्गिक विज्ञान यात पारंगत होता तसेच, तो स्वतःला इतिहासकारभाषा तज्ञही म्हणवून घेत असे. त्याने विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. त्याला या कठिण कामा व संशोधनाबद्दल गौरवण्यात आले होते व त्याची भरपाई करण्यात आली.