Jump to content

युसुफखान महंमदखान पठाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यु.म. पठाण या पानावरून पुनर्निर्देशित)
युसुफखान महंमदखान पठाण

डॉ. युसुफखान महंमदखान पठाण १ मार्च (१९३० - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.

शिक्षण

[संपादन]

यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले गेले आहे.

अध्यापन

[संपादन]
  • १९५३-१९५९ : दयानंद महाविद्यालय, सोलापूर
  • १९६०-१९९० : तत्‍कालीन मराठवाडा विद्यापीठाच्‍या (आजच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) मराठी भाषा व वाड्.मय विभागात प्राध्यापक व १९७३ पासून मराठीचे विभाग प्रमुख कार्य.

त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजून आठवतं ललित लेखसंग्रह
अल बिरूनीचा भारत अनुवाद
अज्ञानसिद्धविरचित वरदनागेश संपादन
आठव : ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा संशोधनपर लेखन
आधुनिक हिंदी कहानियॉं हिंदी
गोपाळदासकृत शुकदेवचरित्र संपादन
चोंभाविरचित उखाहरण संपादन
जितराब कथासंग्रह
डिंभविरचित ऋद्धिपुरमाहात्म्य संपादन
दास आनंद विरचित सुदामचरित्र हिंदी
नंदादीप संशोधनपर लेखन महानुभाव विश्वभारती पुरस्कार
नवरसनारायणविरचित शल्यपर्व संपादन
नागेश संप्रदाय संशोधनपर लेख्न
नामयाची अभंगवाणी संशोधनपर लेखन
निबंधांजली निबंधसंग्रह
पाऊलखुणा ललितलेखसंग्रह
फार्सी-मराठी अनुबंध भाषिक महाराष्ट्र सरकार प्रकाशन जुलै २००७
भाऊसाहेबांची बखर संपादन व प्रकाशन १९५९
मध्ययुगीन संत साहित्य : काही आयाम समीक्षा स्वरूप प्रकाशन
मराठवाडी माणसं व्यक्तिचित्रण
मराठवाड्यातील लोककथा संशोधनपर लेखन
मराठवाड्यातील शिलालेख संशोधनपर लेखन
मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप संशोधनपर लेख्न १९७२(राज्य पुररस्कार)
मराठे संतों की हिंदी वाणी हिंदी
Mahatma Phule and Satyashodhaka Samaaj Monograph
महानुभाव साहित्य संशोधन खंड-१ संशोधनपर लेखन
महाराष्ट्र के महानुभाव साहित्यकारों का हिंदी साहित्य को योगदान हिंदी
रेशीमबंध ललितलेखसंग्रह शब्द प्रकाशन
लीळाचरित्र : एकांक संपादन
लीळाचरित्र : दृष्टान्तपाठ संपादन
लीळाचरित्र : स्मृतिस्थळ संपादन
Lokhitvadi : Pioneer of Rationalism in Maharashtra Monoghaph इंग्रजी महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज या विषयावर
शोधणी संशोधनपर लेखन
संत नामदेव जीवन, कार्य आणि काव्य आणि निवडक नामदेव संशोधनपर लेखन ३ खंड (१२०० पाने) २०१४
संतसंग संशोधनपर लेखन
संतसाहित्य चिंतन संशोधनपर लेखन १९८४(महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार)
संतसाहित्य पुनर्मूल्यांकन संशोधनपर लेखन
सभासद बखर संपादन
सय ललितलेखसंग्रह
स्मरणगाथा व्यक्तिचित्रे
स्वामी रामानंद यांच्या संपादण्या संपादन
हवेली कथासंग्रह

मानसन्मान आणि पुरस्कार

[संपादन]
  • इ.स. १९७२ : ’मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ या ग्रंथासाठी राज्यपुरस्कार
  • इ.स. १९७२ : अतिथी प्राध्यापक(चेकोस्लाव्हाकिया)
  • इ.स. १९७६ : आदर्श शिक्षक(राज्य पुरस्कार)
  • इ.स. १९८२ : ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप(लंडन विश्वविद्यालय)
  • इ.स. १९८४ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून निवड
  • इ.स. १९८४ : ’संतसाहित्य चिंतन’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • इ.स. १९८८ : सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • १९८८ : अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीची डॉ. आंबेडकर फेलोशिप
  • इ.स. १९९० : पुणे येथे झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • १९९०-१९९२ : विद्यापीठ अनुदान मंडळाकडून सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून मान्यता
  • इ.स. १९९२ : कौमी तंजीय हा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  • इ.स. १९९५ : संतसाहित्यविषयक परिवर्तन पुरस्कार
  • इ.स. १९९८ : आचार्य अत्रे पुरस्कार
  • इ.स. १९९९ : मराठवाडा गौरव पुरस्कार
  • इ.स. २००० : पुरोहितस्वामी पुरस्कार
  • इ.स. २००० : साहित्य संस्कृति मंडळाची गौरववृत्ती
  • इ.स. २००१ : दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनची राष्ट्रीय फेलोशिप
  • २००१-०२ : दलितमित्र पुरस्कार
  • इ.स. २००२ : देहू संस्थानचा जगद्‌गुरू पुरस्कार
  • इ.स. २००३ : मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
  • इ.स. २००४ : डॉ. कपाळे साहित्य पुरस्कार(वीरशैव साहित्य पुरस्कार)
  • इ.स. २००७ : भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
  • इ.स. २०११ : महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार
  • इ.स. २०१३ : दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार.