आर.के. नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आर.के. नारायण
जन्म नाव रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी
जन्म ऑक्टोबर १०, इ.स. १९०६
चेन्नई, तमिळनाडू, भारत
मृत्यू मे १३, इ.स. २००१
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती मालगुडी डेज, स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स, दि बॅचलर ऑफ आर्ट्‌स, दि गाईड, दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९५८), पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९६४), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २०००)

आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील.

१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज. जोशी यांनी केले आहे. आर.के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

नारायण यांचे लहान भाऊ आर.के. लक्ष्मण हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकात लक्ष्मण यांची व्यंगचित्रे "यू सेड इट" या शीर्षकाखाली गेली अनेक वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत आली आहेत.

साहित्य[संपादन]

 • अंडर द बन्यन ट्री ॲन्ड अदर स्टोरीज
 • ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ॲन्ड अदर स्टोरीज
 • दि इंग्लिश टीचर (मराठी अनुवाद : अशोक जैन)
 • दि एमेराल्ड रूट
 • ग्रँडमदर्स टेल
 • दि गाईड (मराठी रूपांतर : श्री.ज. जोशी)
 • टॉकेटिव्ह मॅन
 • अ टायगर फॉर मालगुडी
 • दि डार्क रूम
 • नेक्स्ट संडे
 • दि पेंटर ऑफ साइन्स
 • दि फायनान्शियल एक्सपर्ट
 • दि बॅचलर ऑफ आर्ट्‌स (मराठी अनुवाद :अशोक जैन)
 • दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी (मराठी अनुवाद ’मालगुडीचा नरभक्षक’, अनुवादिका - सरोज देशपांडे)
 • माय डेज
 • माय डेटलेस डायरी
 • मालगुडी डेज (मराठी अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर).
 • मिस्टर संपत - द प्रिंटर ऑफ मालगुडी
 • अ रायटर्स नाइटमेअर
 • रिलक्टंट गुरू
 • लॉली रोड
 • दि वर्ल्ड ऑफ नागराज
 • दि वर्ल्ड ऑफ स्टोरी-टेलर
 • वेटिंग फॉर दि महात्मा (मराठी अनुवाद - ’महात्म्याच्या प्रतीक्षेत’. अनुवादिका - सरोज देशपांडे)
 • स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स (मराठी अनुवाद ’स्वामी आणि त्याचे मित्र’. अनुवादक अशोक जैन)
 • अ हॉर्स ॲन्ड टू गोट्स