"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ५०: | ओळ ५०: | ||
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :- |
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :- |
||
⚫ | |||
* चांडकं (कानडी भाषेत) |
* चांडकं (कानडी भाषेत) |
||
* तणकट (असमिया, कानडी, गुजराथी, हिंदी भाषा) |
* तणकट (असमिया, कानडी, गुजराथी, हिंदी भाषा) |
||
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी) |
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी) |
||
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा) |
|||
⚫ | |||
==राजन गवस यांच्यावरील पुस्तके== |
==राजन गवस यांच्यावरील पुस्तके== |
०९:०४, २७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
डॉ. राजन गणपती गवस (२१ नोव्हेंबर, इ.स. १९५९[१]) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणाऱ्या 'तणकट' या कादंबरीला २००१ साली साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची ब,बळीचा ही कादंबरीही खूप गाजली.
शिक्षण आणि नोकरी
राजन गवस हे एम.ए. एम.एड. पीएच्.डी. आहेत. त्यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळू लागले.
जीवन
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौडक', 'भंडारयोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
प्रकाशित साहित्य
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमेदेवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत..
- अव्यक्त मांणसांच्या कथा (उत्तम कांबळे यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
- आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह)
- उफराळ (कथासंग्रह)
- कळप (कादंबरी)
- काचाकवड्या (लेख संग्रह)
- कैफियत (ललित गद्य)
- चांगदेव चतुष्टयासंबंधी (ललित गद्य)
- चौंडकं (कादंबरी)
- तणकट (कादंबरी)
- तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
- ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे)
- धिंगाणा (कादंबरी)
- ब, बळीचा अर्थात जन गणू मन (कादंबरी)
- भंडारभोग (कादंबरी)
- भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ)
- भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
- तणकट (कादंबरी)
- रिवणावायली मुंगी (कथा संग्रह)
- लोकल ते ग्लोबल (कवितासंग्रह)
- रोकडे पाझर (ललित गद्य)
- हुंदका (कवितासंग्रह)
इंग्रजी पुस्तके
- Content Cum Methodology of Marathi (संशोधन ग्रंथ)
- सीमाभागातील मराठी बोली (संशोधन ग्रंथ)
- Linguistic Study of Marathi Sexual Folk Stories (संशोधन ग्रंथ)
चालू संशोधन
- Colloquial Language of Labours In Construction
- Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level
- Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka
- A Study of Linguistics of Superstition
संपादित ग्रंथ
- चांगदेव चतुष्टयासंबंधी
- तिरकसपणातील सरलता
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :-
- कानडी भाषेत राजन गवस यांच्या१३ कथा अनुवादित झाल्या आहेत.
- चांडकं (कानडी भाषेत)
- तणकट (असमिया, कानडी, गुजराथी, हिंदी भाषा)
- भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)
- रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा)
राजन गवस यांच्यावरील पुस्तके
- कादंबरीकार राजन गवस (अनिल बोपचे)
- राजन गवस यांचे कथात्म साहित्य : एक चिकित्सक अभ्यास (प्रबंध; लेखक गोविंद सखाराम काजरेकर, मार्गदर्शक -वासुदेव सावंत)
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार २००१ - तणकट पुस्तकासाठी.
- अनंत लाभसेटवार पुरस्कार
- ह.ना. आपटे पुरस्कार
- भैरूरतन दमाणी पुरस्कार
- भंडारभोग या कादंबरीला संस्कृती प्रतिष्ठान, वि.स. खांडेकर आणि ग.ल. ठोकळ हे पुरस्कार मिळाले आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर (२१ नोव्हेंबर २०१३). लोकसत्ता http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/. ४ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)