प्रभाकर नारायण पाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भाऊ पाध्ये या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
प्रभाकर नारायण पाध्ये


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये (नोव्हेंबर २६, १९२६ - ऑक्टोबर ३०, १९९६) हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते.

जीवन[संपादन]

पाध्यांचा जन्म नोव्हेंबर २६, १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा - कथा/लेख/भाषणं’ या नावाने आणि राजन गवस यांनी ’भाऊ पाध्ये यांची कथा’ या नावाने पाध्यांच्या कथांचा संग्रह संपादित केला आहे.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अग्रेसर पॉप्युलर प्रकाशन इ.स. १९६८
ऑपरेशन छक्का इ.स.
एक सुन्हेर ख्वाब कथासंग्रह धारा प्रकाशन इ.स.
करंटा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
गुरुदत्त चरित्र
डोंबार्‍याचा खेळ कथासंग्रह डिंपल प्रकाशन इ.स. १९६७
दावेदार
पिचकारी विनोदी कथा इ.स.
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर ेकादंबरी पॉप्युलर प्रकाशन इ.स. १९६७
भाऊ पाध्ये यांची कथा संपादित संकलन
भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा संपादित संकलन लोकवाङ्मय गृह
मुरगी कथासंग्रह डिंपल प्रकाशन इ.स. १९८१
राडा कादंबरी अक्षर प्रकाशन/शब्द पब्लिकेशन इ.स. १९७५
वॉर्ड नंबर ७-सर्जिकल कादंबरी डिंपल प्रकाशन इ.स. १९८०
वासूनाका कादंबरी पॉप्युलर प्रकाशन इ.स.१९६५
वैतागवाडी पॉप्युलर प्रकाशन इ.स.१९६५
वैतागवाडी (५वी आवृत्ती) शाल्मली प्रकाशन इ.स. २००७
होमसिक ब्रिगेड डिंपल प्रकाशन

बाह्य दुवे[संपादन]