"हमीद दलवाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
* लाट |
* लाट |
||
* इंधन |
* इंधन |
||
* भारतातील मुस्लिम राजकारण (प्रकाशन दिनांक - ९ जानेवारी, २०१७) |
|||
* मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया |
* मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया |
||
* राष्ट्रीय एकात्मका आणि भारतीय मुसलमान <ref>[http://www.loksatta.com/old/daily/20030105/loklaksh.htm १]{{मृत दुवा}}</ref> |
* राष्ट्रीय एकात्मका आणि भारतीय मुसलमान <ref>[http://www.loksatta.com/old/daily/20030105/loklaksh.htm १]{{मृत दुवा}}</ref> |
१६:००, १४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हमीद दलवाई | |
---|---|
जन्म: | सप्टेंबर २९, १९३२ |
मृत्यू: | १९७७ |
चळवळ: | मुस्लिम समाजसुधारणा चळवळ |
संघटना: | मुस्लिम सत्यशोधक मंडळ |
धर्म: | इस्लाम |
वडील: | उमर |
पत्नी: | मेहरुन्निसा |
हमीद उमर दलवाई (जन्म : सप्टेंबर २९, १९३२; मृत्यू : ३ मे, १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७०मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रण्याचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.
हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढाला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी ही या मोर्च्याचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा लहिलाच मोर्चा असावा.
महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर भावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी.
समाजप्रबोधनाचे काम करणार्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.
प्रकाशित साहित्य
- लाट
- इंधन
- भारतातील मुस्लिम राजकारण (प्रकाशन दिनांक - ९ जानेवारी, २०१७)
- मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया
- राष्ट्रीय एकात्मका आणि भारतीय मुसलमान [१]
पुरस्कार
मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांची अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. (जानेवारी २०१७). हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हमीद दलवाई यांचे चरित्र
- हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत (लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी)
संदर्भ