इस्लाम धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

इस्लाम धर्म हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३%) आहे. लोकसंख्येनुसार (ख्रिश्चन धर्मांनंतर) जगातील हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १८ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.एक मुस्लिम म्हणजे इस्लामिक धर्माचे अनुयायी म्हणून ओळखले जाते. मुसलमानांचा असा विश्वास आहे की त्यांचा पवित्र मजकूर, कुराण हा देवाचा संदेश आहे ज्यांचा अर्थ प्रेषित मुहम्मदकडे आहे.आपण विचारू शकतो की, एक धर्म आहे जो देवाच्या एकतेला आणि मानवजातीच्या एकतेला शिकवते, आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णु आहे? हे नक्कीच इस्लामचे शिक्षण आहे. खरं तर, इस्लामचा असा अर्थ आहे की ईश्वराच्या एकतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा हा मूळ संदेश आहे. जो अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविले.इस्लाम  देवाच्या एकतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करते.  मुसलमान त्यांचे धर्म इस्लामला संबोधतात आणि अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय. मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेला एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून स्वतःमध्ये शांती आहे. इस्लामवासी एक, चिरंतन देवावर विश्वास ठेवतात, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आहे आणि अस्तित्वात असलेले सर्व. अरबीमध्ये, देव अल्लाह म्हणून ओळखला जातो. पवित्र कुरान हे इस्लामचे उघड आणि पवित्र शास्त्र आहे

इस्लाम  शिकवते[संपादन]

इस्लाम  शिकवते की मनुष्य शुद्ध आणि निर्दोष जन्माला येतात. कोणीही इतरांच्या पापांची जबाबदारी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. क्षमाशीलतेचे दरवाजे नेहमीच उघडतात ज्यांनी पश्चात्ताप केला आहे.

इस्लामची तत्त[संपादन]

  • अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
  • मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
  • दिवसातून् पाच वेळा नमाज पढणे
  • आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
  • आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)

कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.

इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.

मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी कुराण उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज यहुदी व ख्रिस्ती धर्मा या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.

इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.

इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शियासुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहम्मद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्त चौथ्या खलीफाला मानणारे शियापंथीय बनले.

इस्लामवरील पुस्तके[संपादन]