मुस्लिम सत्यशोधक मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च २२, १९७० रोजी पुण्यात स्थापन झाली. मंडळाच्या जाहीरनाम्यात भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी ह्या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे, राष्टीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे, स्त्री-पुरुष-समानता निर्माण होणे ह्या निकडींतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. [१]

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची प्रमुख उद्दिष्टे[२][संपादन]

  • मुस्लिम महिलांवरील अन्यायाचे निर्मूलन करणे आणि त्यांना समान अधिकार मिळवून देणे. ह्यासाठी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात (मुस्लिम पर्सनल लॉ) ह्यात सुधारणेची किंवा भारतीय संविधानाच्या ४४व्या कलमानुसार समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे.
  • आपल्या स्थानिक भाषांत आधुनिक शिक्षण घेण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे व त्यासाठी साहाय्य करणे तसेच त्यांना शैक्षणिक आणि व्यवसायलक्ष्यी मार्गदर्शन पुरवणे
  • समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इहवाद अत्यावश्यक आहे. इहवादासमवेतच ही संस्था भारतीय संविधानातील मूल्यांचा पुरस्कार करते.
  • कट्टरता, कालबाह्य रूढी अंधश्रद्धा आणि जातीयवाद ह्यांना विरोध करणे
  • समाजाला कुटुंब-नियोजन, आरोग्य आणि इतर सामाजिक प्रश्नांबाबत शिक्षित करणे
  • जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी प्रयत्न करणे
  • धार्मिक सणांना समाजलक्ष्यी कृतिकार्यक्रमांचा पर्याय देणे उदा. बकरी ईदच्या दिवशी रक्तदान-शिबिर घेणे
  • सुधारक संघटनांच्या सोबतीने सामाजिक कृतिकार्यक्रमांचे आयोजन करणे

संदर्भनोंदी[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]