"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →कारकीर्द |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीनं काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार "ग्रंथराज‘ही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कंपनी कामकाज आदी वेगवेगळ्या विषयांवर लिखाणाला सुरवात केली. |
|||
⚫ | |||
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली. |
|||
⚫ | |||
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे |
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे |
||
ओळ ३०: | ओळ ३२: | ||
* संगणक- युग (माहितीपर) |
* संगणक- युग (माहितीपर) |
||
* स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते) |
* स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते) |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१४:२६, २२ जुलै २०१६ ची आवृत्ती
अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.
बालपण
अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली.
कारकीर्द
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीनं काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार "ग्रंथराज‘ही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कंपनी कामकाज आदी वेगवेगळ्या विषयांवर लिखाणाला सुरवात केली.
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. [ संदर्भ हवा ] आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली.[ संदर्भ हवा ]
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके
- अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
- Operating Systems (सहलेखक - अतुल कहाते)
- कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख)
- किमयागार (विज्ञानविषयक)
- गणिती (गणिताची आवड निर्माण करणारी एक रसीली सफर; सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक - अतुल कहाते)
- झपूर्झा - भाग १, २, ३ (प्रसिद्ध इंग्रजी लेखकांचे साहित्य आणि त्याची समीक्षा, सहलेखिका - नीलांबरी जोशी)
- जग बदलणारे १२ जीनिअस (पुस्तकसंच, सहलेखिका - दीपा देशमुख)
- Data Communications And Networks (सहलेखक - अतुल कहाते)
- Demystifying Computers
- थैमान चंगळवादाचे (वैचरिक)
- नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजीविषक, सहलेखिका - डॉ. माधवी ठाकूरदेसाई)
- नादवेध (संगीतविषक, सहलेखिका - सुलभा पिशवीकर)
- बोर्डरूम (सहलेखक - अतुल कहाते)
- मनात (मानसशास्त्रविषयक)
- मुसाफिर (आत्मकथन)
- लाईम लाईट (सहलेखिका नीलांबरी जोशी) : विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा
- Web Technologies (सहलेखक - अतुल कहाते)
- संगणक- युग (माहितीपर)
- स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते)
बाह्य दुवे