"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →जीवन |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबर्या देवदासी व जोगव्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबर्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवादही झाले. |
अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबर्या देवदासी व जोगव्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबर्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवादही झाले. |
||
* अव्यक्त मांअसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]]यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस) |
|||
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह) |
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह) |
||
* कळप (कादंबरी) |
* कळप (कादंबरी) |
१३:२३, ७ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राजन गवस (२१ नोव्हेंबर, इ.स. १९५९[१]) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणार्या 'तणकट' या कादंबरीला २००१ साली साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचतात.
जीवन
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरीलेखनाचा. 'चौडक', 'भंडारयोग', ' कळप' या कादंबर्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. . उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
राजन गवस यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. त्यानंतर गारगोटी या गावी असणार्या मौनी विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.
प्रकाशित साहित्य
अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबर्या देवदासी व जोगव्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबर्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवादही झाले.
- अव्यक्त मांअसांच्या कथा (उत्तम कांबळेयांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
- आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह)
- कळप (कादंबरी)
- काचाकवड्या (लेख संग्रह)
- कैफियत (ललित गद्य)
- चांगदेव चतुष्टयासंबंधी (ललित गद्य)
- चौंडकं (कादंबरी)
- ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (संपादक -रणधीर शिंदे)
- धिंगाणा (कादंबरी)
- ब बळीचा (कादंबरी)
- भंडारभोग (कादंबरी)
- भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ)
- भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
- तणकट (कादंबरी)
- रिवणावायली मुंगी (कथा संग्रह)
- रोकडे पाझर (ललित गद्य)
- हुंदका (कवितासंग्रह)
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार २००१ - तणकट पुस्तकासाठी.
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर (२१ नोव्हेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ४ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.