मे १८
Appearance
(१८ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३८ वा किंवा लीप वर्षात १३९ वा दिवस असतो.
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६५२ - अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्याने गुलामगिरी बेकायदेशीर ठरवली.
अठरावे शतक
[संपादन]- १७६५ - कॅनडातील मॉॅन्ट्रिआल शहरात भीषण आग.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०३ - युनायटेड किंग्डमने एमियेन्सचा तह झिडकारला व फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८०४ - नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.
- १८६९ - जपानचे एझो प्रजासत्ताक बरखास्त.
- १८७६ - कॅन्ससच्या डॉज सिटी शहरात वायेट अर्प पोलिसकामात रुजू झाला.
विसावे शतक
[संपादन]- १९०० - युनायटेड किंग्डमने टोंगा आपल्या साम्राज्याचा भाग असल्याचे जाहीर केले.
- १९१७ - अमेरिकन काँग्रेसने नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिला.
- १९२७ - मिशिगनच्या बाथ शहरात शाळेच्या अधिकाऱ्याने शाळेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ४५ ठार.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-मॉन्टे कॅसिनोची लढाई - उभय पक्षातील २०,००० सैनिकांच्या मृत्यूनंतर जर्मन सैन्याची पीछेहाट.
- १९५३ - जॅकी कॉक्रन ही स्वनातीत विमान चालवणारी प्रथम स्त्री ठरली.
- १९५८ - अमेरिकेच्या एफ.१०४ स्टारफायटर विमानाने ताशी २,२५९.८२ कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
- १९६९ - अपोलो १०चे प्रक्षेपण.
- १९७४ - भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला.
- १९८० - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील माउंट सेंट हेलेन्स या ज्वालामुखीचा उद्रेक. ५७ ठार. ३,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- १९८० - पेरूमध्ये शायनिंग पाथ या अतिरेकी संघटनेने मतदान केन्द्रावर हल्ला चढवून आपल्या कारवायांची सुरुवात केली.
- १९९२ - अमेरिकेच्या संविधानातील २७वा बदल अधिकृतरीत्या मान्य.
- १९९५ - अलेन जुप्पे फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
[संपादन]- इ.स. २०१५ - मुंबईच्या केईएम हॉस्पिलमध्ये नर्स असलेल्या अरुणा शानबाग यांचे निधन.
जन्म
[संपादन]- १०४८ - उमर खय्याम, पर्शियन कवी.
- १६८२ - छत्रपती शाहूराजे भोसले, मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती
- १७९७ - फ्रेडेरिक ऑगस्टस दुसरा, सॅक्सनीचा राजा.
- १८६८ - निकोलाई अलेक्सांद्रोविच रोमानोव्ह, रशियाचा शेवटचा झार.
- १८७२ - बर्ट्रान्ड रसेल, इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ.
- १८७६ - हरमन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
- १८८३ - युरिको गॅस्पर दुत्रा, ब्राझिलचा पंतप्रधान.
- १८९७ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
- १९०५ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२० - पोप जॉन पॉल दुसरा.
- १९२३ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
- १९३१ - डॉन मार्टिन, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- १९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
- १९५५ - चौ युन फॅट, हॉंग कॉंगचा अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- १४५० - सेजॉॅंग, कोरियाचा सम्राट.
- १५८४ - इकेदा मोटोसुके, जपानी सामुराई.
- १६७५ - जॉक मार्केट, फ्रेंच जेसुइट धर्मप्रचारक व शोधक.
- १८४६ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.
- १९५६ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
- १९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.
- २०२० - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)