ग.ल. ठोकळ
Appearance
गजानन लक्ष्मण ठोकळ (२६ मे, १९०९:कामरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - २२ जुलै १९८४) हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील पुस्तक प्रकाशक होते. यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणकाका आणि आईचे नाव सोनाबाई होते. हो दोघेही अल्पशिक्षित परंतु शिक्षक होते. ग.ल. ठोकळांना इंदू, मालती या बहिणी आणि भास्कर, श्याम नावाचे दोन भाऊ होते. त्यांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड होती. ठोकळ हे तिने स्वतःकरिता आणलेली सर्व पुस्तके वाचून काढीत असत.
वयाच्या सोळाव्या वर्षी ठोकळांची आकाशगंगा ही पहिली कविता प्रसिद्ध झाली.
त्यांचे गाव कायम दुष्काळी आणि कोरडवाहू शेती असणारे गाव होते.
पुस्तके
[संपादन]- कोंदण
- गावगंड
- मत्स्यकन्या
- मीठभाकर
- टेंभा
- ठिणगी
- ठोकळ गोष्टी (अनेक भाग, किमान ५)
- कडू साखर
ठोकळ आणि त्यांच्या साहित्यासंबंधी पुस्तके
[संपादन]- साहित्य श्रेष्ठ ग. ल. ठोकळ (व्यक्तिचित्रण, संदर्भ ग्रंथ , लेखक - प्रा. राम शिंदे)
ठोकळ यांच्या नावाचे पुरस्कार आणि ते मिळालेले लेखक
[संपादन]अनेक संस्था कै. ग.ल. ठोकळ यांच्या नावाचे पुरस्कार देतात, त्यांपैकी काही पुरस्कारप्राप्त लेखक :