दीनानाथ मनोहर
Appearance
दिनानाथ केशव मनोहर | |
---|---|
जन्म |
२२ सप्टेंबर १९४० नासिक |
राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
कार्यक्षेत्र | विज्ञान कथा, कादंबरी |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, विज्ञानकथा, कादंबरी, पुस्तिका |
विषय | सामाजिक |
चळवळ | भील आदिवासींमध्ये समाजकार्य, श्रमिक संघटना, शहादे |
प्रसिद्ध साहित्यकृती | रोबो, मन्वंतर, कबिरा खडा बाजारमे |
दीनानाथ मनोहर (जन्मदिनांक २२-९-४० - हयात) हे मराठी कादंबरी व कथाकार आहेत.
प्रकाशित साहित्य
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
आंदोलन | कादंबरी | ग्रंथाली प्रकाशन | |
ऐल ते पैल | कथा संग्रह | मधुरा प्रकाशन | |
कबीरा खडा बाजार में | कादंबरी | लोकवाङमय गृह | |
प्रदेश साकल्याचा | कादंबरी | मुद्रा प्रकाशन | |
मन्वंतर | कादंबरी | राजहंस प्रकाशन | |
रोबो | कादंबरी | ग्रंथाली प्रकाशन | २०१२ |
सीमान्त | कादंबरी | ग्रंथाली प्रकाशन |
ई-पुस्तके
[संपादन]दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एकआहे. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बऱ्याच कादंबऱ्या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती. पण अनेक कारणांनी ते होत नव्हते. शेवटी ई साहित्याने तीन वर्षांपूर्वी ती पीडीएफ ई-पुस्तक म्हणून काढली आणि ती पुन्हा प्रकाशात आली. त्यानंतर ती मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावली. त्यापाठोपाठ शब्द प्रकाशनाने रोबो छापलीदेखील. आता दीनानाथ मनोहरांनी आपली आत्तापर्यंतची सर्व प्रकाशित म्हणजे आठ पुस्तके ई पुस्तक स्वरूपात काढायचे ठरवले असून ती हलन्त प्रकाशित करीत आहे.
पुरस्कार व गौरव
[संपादन]- अध्यक्ष, तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नांदेड, इ.स. २०११
- ’शब्द द बुक गॅलरी‘चा भाऊ पाध्ये साहित्यगौरव शब्द पुरस्कार‘ (एप्रिल २०१३)
बाह्य दुवे
[संपादन]- "वाचण्याजोगे काही". २१ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - "अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मनोहर". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |