केज विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कैज विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

केज विधानसभा मतदारसंघ - २३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, केज मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. केज तालुका, २. बीड तालुक्यातील नेकनूर महसूल मंडळ आणि ३. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगांव, अंबाजोगाई ही महसूल मंडळे आणि अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. केज हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे नमिता अक्षय मुंदडा हे केज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ नमिता अक्षय मुंदडा भारतीय जनता पक्ष
२०१४ संगीता विजयप्रकाश ठोंबरे भारतीय जनता पक्ष
२००९ विमलताई नंदकिशोर मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

केज विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०१२ [५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ http://72.78.249.125/esakal/20120616/4861962659288057373.htm. Missing or empty |title= (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे[संपादन]