ठुमरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठुमरी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

परिचय[संपादन]

ठुमरीचा उगम इसवी सनाच्या १६-१७व्या शतकात उत्तर प्रदेशातील लोकसंगीतातून झाला. गंगा-यमुना ह्या नद्यांच्या मधल्या प्रदेशात ठुमरीचा प्रसार झाला.

ठुमरी हा शब्द ठुमकना म्हणजे एखाद्या तालावर आकर्षक अशी चाल (नृत्य) करणे, ह्या शब्दावरून बनला आहे. त्यामुळे ठुमरीमध्ये इंद्रियग्राह्यता हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. अर्थात काही ठुमर्‍या भक्तिरसप्रधान असल्या तरी पण बहुतेक ठुमर्‍या भावात्मक असतात आणि त्यातील हीच भावपूर्णता गायनातून दाखवणे हे मूळ उद्दिष्ट असते. ठुमरीचे व्याकरण, तिची विद्याविषयक परंपरा अतिशय एकमेव आहे.

आधीच्या ठुमर्‍या अवधी, भोजपुरी, मिर्झापुरी ह्या बोलीभाषांमध्ये रचल्या गेल्या. अर्थात काही ठुमर्‍या मराठी आणि बंगाली भाषेतही आहेत.

रागांच्या विविध रसांमुळे ठुमरीतील वेगवेगळ्या भावनांना योग्य तो न्याय देणे शक्य होते. त्यामुळे जरी ठुमरी हा उपशास्त्रीय गायनप्रकार असला तरी तो गाणे पक्की शास्त्रीय बैठक असल्याशिवाय सोपे नाही. कारण ही गाताना एका रागातून दुसर्‍यात जाऊन पुन्हा मूळ चालीवर येणे अगदी सहजरीत्या घडावे लागते. ठुमरी बहुतेक करून, ज्यांत ’बडे ख्याल’ गायले जात नाहीत, जे हलकेफुलके राग मानले जातात त्या काही ठरावीक रागांमध्ये बांधलेली असते. असे राग म्हणजे खमाज, पिलू, तिलंग, देस, तिलक-कामोद, मांड, जोगिया, कलिंगडा, शिवरंजनी, भैरवी इत्यादी.. ह्या रागांमध्ये भावपूर्तीला जास्त वाव असतो. अपवाद म्हणून काही ठुमर्‍या ’मोठ्या’ म्हणजे ज्या रागांमध्ये ’बडे ख्याल’ गायले जातात अशा रागांमध्ये सुद्धा बांधल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, राग बिहाग, शहाणा, सारंग, पूर्वी, कल्याण, सोहोनी, वगैरे.

बोल[संपादन]

ठुमरीतले शब्द अतिशय लडिवाळ असतात. उदाहरणार्थ ’पाणी’ ह्या शब्दाला ’पनिया’ असे काव्यमय रीतीने उच्चारले जाते. ’पिया’ हा शब्द ’पियू’ किंव्हा ’पिहरवा’ बनतो. ठुमरीमध्ये प्रेम, विरह, हृदयभंग, दुरावा, मानवी नाती असे विषय हाताळले जातात. ठुमरीचे शब्द जास्त करून प्रेमात असलेल्या स्त्रीवर आधारलेले असतात. ठुमरी गाताना “बोल-अंग” फार महत्त्वाचे असते. शब्दांच्या अर्थाला पूर्ण न्याय देण्याकरिता वेगवेगळ्या रागांचे मिश्रण करून ’बोल-वाट’ दाखवली जाते.

ताल[संपादन]

ठुमरी ही ठरावीक तालांमध्ये गायली जाते – दीपचंदी (१४ मात्रा), अद्धा त्रिताल (१६ मात्रा), इक्वाई (१६ मात्रा), सितारखानी (१६ मात्रा). असे असले तरी काही ’बंध ठुमर्‍या’ झपताल किंव्हा एकतालात देखील बांधलेल्या असतात, तर काही ठुमर्‍या ठाय लयीच्या केहेरव्यात किंवा दादरा तालात गायल्या जातात.

बाह्य दुवे[संपादन]


हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.