Jump to content

विजया वाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विजया वाड
जन्म

महाराष्ट्र, भारत

राष्ट्रीयत्व = भारत भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
अपत्ये दोन मुली (प्राजक्ता आणि निशिगंधा)

डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिका आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या ९ डिसेंबर २००५ ते ३० जून २०१५ पर्यंत अध्यक्षा होत्या. [] अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या त्या आई आहेत.

शिक्षण

[संपादन]

वाड या बी.एस्‌सी. बी.एड. एम.ए. असून मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी आहेत. []

शैक्षणिक कारकिर्दीतले पुरस्कार/पारितोषिके

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी- के.जे.सोमैय्या कॉलेज, मुंबई १९६४
  • बुद्धिबळ - विजेतेपद - के. जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
  • बुद्धिबळ - उपविजेती - मुंबई विद्यापीठ १९६५
  • टेबलटेनिस - विजेतेपद - के.जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
  • सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३
  • सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थिनी -रोटरी पारितोषिक - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३
  • लायब्ररी ॲवॉर्ड - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३.
  • टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३.
  • पीएच.डी.चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.

शैक्षणिक प्रकल्प

[संपादन]
  • आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे. इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण
  • कर्णबधिर - अंध बालके व नॉर्मल मुले - मेलजोल
  • रुग्णालयांचे बालविभाग दिवाळी, नाताळात सजविणे. प्रार्थना करणे
  • पदपथावरील मुलांसाठी गाणी - गोष्टी, छंदवर्ग गावोगावी कुमार - बालमेळावे
  • मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन, आत्मविश्वास वाटावा, भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने
  • स्वच्छ सुंदर विक्रोळी स्टेशन - पर्यावरण प्रकल्प - (१९९५)
  • विक्रोळी (मुंबई) येथील उदाचल शाळेत ५०० मुले व ११ शिक्षक यांच्यासह प्रकल्प. (सृजन, संकल्पना व समन्वयक विजया वाड). या शाळेला ५० हजार रुपयांचे कॅथेपॅसिफिक ॲवॉर्ड मिळवून दिले.
  • मुबईतील पोदार शाळेत हिरवे स्वप्न, एक हिरवी गोष्ट हे पर्यावरण प्रकल्प. (तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांजकडून कौतुक २००२-०३)
  • मुंबईतील पोदार मराठी शाळेचा एस्.एस्.सी.चा निकाल ५६ टक्क्यांवरून ९३.१२ टक्क्यांपर्यंत उंचावण्यात यश २००० ते २००३
  • पोदार विद्यासंकुलकडून १५० पूरग्रस्त बालकांना दत्तक पालक मिळवून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात पुढाकार २६ जुलै २००५
  • मराठी भाषाप्रकल्प
    • भाषा शुद्धी प्रकल्प
    • प्रमाण भाषा प्रकल्प
    • पाठयपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प
    • नाट्यीकरण प्रकल्प
    • वाचनवेग प्रकल्प
  • पौगंडावस्थेतील भारतीय मुलीच्या समस्या ह्या विषयावर अमेरिका, लंडन, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस येथे व्याख्याने
  • अनेक वृत्तपत्रांतून लेखन व 'लोकमत' ह्या वृत्तपत्रातून ’कुमार विश्वकोशाची झलक’ ही साप्ताहिक लेखमाला.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • प्रिय आई बाबा
  • वेधक विजया वाड (स्वयंसंपादित)

कादंबऱ्या

[संपादन]
  • आजन्म
  • अंतरंग
  • अतोल
  • अभिनेत्री
  • अभोगी
  • अशरण
  • अक्षयगीत
  • अक्षांश रेखांश
  • आघात
  • आलेख
  • कथांजली
  • कमलांकित
  • त्या तिघी
  • त्या होत्या म्हणून (अनुश्री प्रकाशन)[]
  • त्रिदल
  • पैठणी
  • प्रेमरज्जू
  • फॅमिली. काॅम
  • बीज आणि अंकुर
  • वजाबाकी
  • वेगळी
  • सांज-शकुन
  • सोंगटी
  • सोबत
  • हारजीत

कथासंग्रह

[संपादन]
  • अवेळ
  • आक्कू आणि इतर कथा
  • आपली माणसं
  • ॠणानुबंध
  • कथांजली
  • कथामंजिरी
  • कथा सुगंध
  • गप्पागोष्टी
  • गाठोडं
  • गुजगोष्टी
  • गोष्टींचे घर
  • जीवनहिंदोळा
  • तुमच्या आमच्या गोष्टी
  • दुकाकी
  • मला काही सांगायचंय
  • हदयस्पर्शी

नाटके

[संपादन]
  • एक हिरवी गोष्ट
  • तिची कहाणी
  • त्या तिघी

कवितासंग्रह

[संपादन]
  • देवऋषी

पालकांसाठी

[संपादन]
  • आपली मुलं

पालकांसाठी व इयत्ता दहावीतील मुलांसाठी

[संपादन]
  • दहावी आता बिनधास्त

प्रवास वर्णन

[संपादन]
  • कमीत कमी खर्चात अमेरिका

बालकादंबऱ्या

[संपादन]
  • ओजू एंजल
  • झिप्री
  • टिंकू टिंकल
  • डॅनी डेंजर
  • दिव्याचे दिव्य
  • फुलवा
  • बंडू बॉक्सर
  • बिट्टीच्या बारा बाता

बालकांसाठी कथा

[संपादन]
  • अदभुत जगाच्या सफरीवर
  • उत्तम कथा
  • गोष्टी घ्या गोष्टी
  • चंमतगचष्टीगो
  • हट्टी राणी आणि कपिलदेव

बालकविता

[संपादन]
  • इटुकली मिटकली गाणी
  • छोटुली छोटुली गाणी, गाणी
  • वनराणीची
  • वेडगाणी

बालनाटके

[संपादन]
  • खेळणीघर व स्टेशनघर
  • चिंगू चिंगम
  • टिंकू टिंकल
  • डॅनी डेंजर
  • दोन मित्र
  • बंडू बॉक्सर,
  • निळूच्या नवलकथा , ,
  • मिनी मंगळावर

बालचित्रपट

[संपादन]
  • बंडू बॉक्सर (हिंदीत)
  • लाडी

लहान मुलांसाठी कॅसेट्स

[संपादन]
  • अबूनी ढबू
  • एक हिरवी गोष्ट
  • चिकुमिकी चिंगचँग
  • पोट धरून हसा
  • संस्कार कथा
  • संस्कार
  • हट्टी राणी आणि कपिलदेव

बालनाटके

[संपादन]
  • गमत्या गुड्डू
  • चिंगू चिंगम बबली बबलगम
  • मिनी मंगळवार

बालवाचकांसाठी चरित्रे

[संपादन]
  • डॉ. जयंत नारळीकर
  • भीमसेन जोशी

आकाशवाणी मालिकेसाठी लेखन

[संपादन]
  • गमत्या गुड्डू
  • चंदेरी सोनेरी
  • चिंगू चिंगम
  • जीवन हिंदोळा
  • टिंकू टिंकल
  • बंडू बॉक्सर
  • बिट्टीच्या बारा बाता
  • सोंगटी

दूरदर्शन मालिका लेखन

[संपादन]
  • चिंगू चिंगम
  • मराठी कृष्णायन
  • मराठी रामायण
  • सखी
  • हारजीत

दूरदर्शनवर नाटिका

[संपादन]
  • अनंत

अन्य

[संपादन]
  • किशोरी आरोग्यकोश

गौरव

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
  • सोबत या कादंबरीला : ’प्रपंच’चा कादंबरी पुरस्कार १९७६
  • अतोल या कादंबरीला : उत्कृष्ट कादंबरीसाठीचा रघुवीर शरयू पाटील पुरस्कार १९७८
  • अवेळ या कथासंग्रहाला : सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा ग.रा.बाळ पुरस्कार १९८२; महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार १९८८
  • ’टिंकू टिकल’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९०
  • ’बंडू बॉक्सर’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९१
  • ’देवॠषी’ला- पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार (पर्यावरणावरील उत्कृष्ट सोपी कविता) १९९३
  • ’झिप्री’ला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार १९९५
  • ’तन्वी’ संस्थेचे सर्वोत्कृष्ट बालकादंबरी स्वर्णपदक १९९९
  • ल.ग.गद्रे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार १९९८.
  • युवक प्रतिष्ठानचा मुलुंडभूषण पुरस्कार १९९९
  • ’सोंगटी’ला सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा सुगंध वाचक पुरस्कार १९९९
  • ’आरंभ’साठी पुरस्कार १९९९
  • ’दुकाकी’साठी पुरस्कार २०००.
  • संस्कारभारतीचे साहित्यविषयक गौरवचिन्ह २०००
  • लोणावळ्यातील मनशक्ती केंद्राचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००२.
  • महाराष्ट्र ओबीसी महिला फेडरेशनचा उपक्रमशील गुणवंत महिला पुरस्कार २००३
  • मुलुंडच्या रोटरी इनरव्हीलचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २००३
  • निर्मला वैद्य प्रतिष्ठानचा जिजामाता पुरस्कार २००३
  • भारतीय विद्यार्थी सेनेकडून ’सन्मान मराठीचा’ हे सन्मानचिन्ह २००५
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत लेखिका पुरस्कार (२०१५)

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक". मराठी विश्वकोश. ९ मे २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "शब्द व्हावे सारथी". लोकसत्ता. २२ सप्टेंबर २०१८. ९ मे २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ म.टा. परीक्षण[permanent dead link]