Jump to content

"गजमल माळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
'''गजमल माळी''' (जन्मः [[इ.स. १९३४]]) हे [[मराठी]] भाषेतील [[लेखक]], [[कवी]] व [[नाटककार]] असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते.
'''गजमल माळी''' (जन्मः [[इ.स. १९३४]]) हे [[मराठी]] भाषेतील [[लेखक]], [[कवी]] व [[नाटककार]] असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते.

प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते. अौरंगाबाद येथील कॉलेजचे स्थापनेपासून १५ जून १९७१ ते ३१ मार्च १९९४पर्यंत ते प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राचार्य, साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे तीन काव्यसंग्रह, पाच संपादित ग्रंथ, लोकसाहित्य शब्दकोषाचे संकलन, सत्यशोधक समाजावरील पुस्तके प्रकाशित आहेत.
प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते.

अजिंठा लेण्यांच्या परिसरात फुललेली रॉबर्ट गिल (अजिंठा लेणी प्रकाशात आणणारे ब्रिटिश अधिकारी) आणि पारो यांची प्रेमकहाणी ‘कल्पद्रुमाची डहाळी’ या नाटकातून गजमल माळींनी लिहिली. तिच्यावरून ‘पारू’ हा चित्रपट निघाला.

ओळ ४९: ओळ ४९:
* कामायनी (कादंबरी)
* कामायनी (कादंबरी)
* गंधवेणा (कवितासंग्रह)
* गंधवेणा (कवितासंग्रह)
* ग्यानोबा कृष्णाजी ससाणे (चरित्र)
* तुकारामाचे निवडक शंभर अभंग (संपादित ग्रंथ)
* तुकारामाचे निवडक शंभर अभंग (संपादित ग्रंथ)
* नागफणा (खंडकाव्य)
* नागफणा आणि सूर्य (खंडकाव्य)
* महात्मा जोतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर (वैचारिक)
* महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित ग्रंथ)
* महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित ग्रंथ)
* राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज (वैचारिक ग्रंथ)
* राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज (वैचारिक ग्रंथ)
* वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले (वैचारिक ग्रंथ)
* वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले (वैचारिक ग्रंथ)
* सूर्य (खंडकाव्य)

==सन्मान आणि पुरस्कार==
==सन्मान आणि पुरस्कार==
* मराठी साहित्य महामंडळ, मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* मराठी साहित्य महामंडळ, मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* ‘वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले’ या त्यांच्या ग्रंथाला ‘मधुराबाई पिंगळे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
* ‘वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले’ या त्यांच्या ग्रंथाला ‘मधुराबाई पिंगळे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
* नागफणा आणि सूर्य या ग्रंथाला नागपूर येथील डॉ. दुर्गेश पुरस्कार मिळाला आहे.

* ग्यानोबा कृष्णाजी ससाणे या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* महात्मा ज्योतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूनगर या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट समीक्षालेखनाचे पहिले पारितोषिक
* कल्पद्रुमाची डहाळी या नाटकास उत्कृष्ट नाट्य लेखनाचे सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आहे.
==वैचारिक==
==वैचारिक==
* राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज
* राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज

२१:०८, १० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

गजमल माळी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता

गजमल माळी (जन्मः इ.स. १९३४) हे मराठी भाषेतील लेखक, कवीनाटककार असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते.

प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते. अौरंगाबाद येथील कॉलेजचे स्थापनेपासून १५ जून १९७१ ते ३१ मार्च १९९४पर्यंत ते प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राचार्य, साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे तीन काव्यसंग्रह, पाच संपादित ग्रंथ, लोकसाहित्य शब्दकोषाचे संकलन, सत्यशोधक समाजावरील पुस्तके प्रकाशित आहेत.

अजिंठा लेण्यांच्या परिसरात फुललेली रॉबर्ट गिल (अजिंठा लेणी प्रकाशात आणणारे ब्रिटिश अधिकारी) आणि पारो यांची प्रेमकहाणी ‘कल्पद्रुमाची डहाळी’ या नाटकातून गजमल माळींनी लिहिली. तिच्यावरून ‘पारू’ हा चित्रपट निघाला.

गजमल माळी ह्यांचा ‘राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज’ हा त्यांचा वैचारिक ग्रंथ काँग्रेस आणि सत्यशोधक समाज यांच्या संबंधांवर प्रकाश टाकतो. या पुस्तकातून बराचसा अज्ञात इतिहास समाजासमोर आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज काँग्रेसकडे कसा वळला आणि त्याचे हे वळणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात कशी होती, याचे विवेचन प्रा. माळी यांनी या वैचारिक ग्रंथातून केले आहे.

प्राचार्य गजमल माळी हे ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक-राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित, समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दखल घेतली. ते केवळ लेखक नव्हते, तर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.

जीवन

कारकीर्द

प्राचार्य गजमल माळी यांनी लिहिलेली पुस्तके

  • कल्पद्रुमाची डहाळी (नाटक) (मूळ कथालेखक - फादर फ्रान्सिस दिब्रिटो)
  • कामायनी (कादंबरी)
  • गंधवेणा (कवितासंग्रह)
  • ग्यानोबा कृष्णाजी ससाणे (चरित्र)
  • तुकारामाचे निवडक शंभर अभंग (संपादित ग्रंथ)
  • नागफणा आणि सूर्य (खंडकाव्य)
  • महात्मा जोतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर (वैचारिक)
  • महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित ग्रंथ)
  • राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज (वैचारिक ग्रंथ)
  • वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले (वैचारिक ग्रंथ)

सन्मान आणि पुरस्कार

  • मराठी साहित्य महामंडळ, मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ‘वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा ज्योतिराव फुले’ या त्यांच्या ग्रंथाला ‘मधुराबाई पिंगळे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
  • नागफणा आणि सूर्य या ग्रंथाला नागपूर येथील डॉ. दुर्गेश पुरस्कार मिळाला आहे.
  • ग्यानोबा कृष्णाजी ससाणे या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • महात्मा ज्योतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूनगर या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट समीक्षालेखनाचे पहिले पारितोषिक
  • कल्पद्रुमाची डहाळी या नाटकास उत्कृष्ट नाट्य लेखनाचे सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आहे.

वैचारिक

  • राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज

कल्पद्रुमाची डहाळी

१८१९ साली एका जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यास अजिंठ्यातील लेण्यांचा शोध लागला. इ.स. १८४४ मध्ये ब्रिटिश सरकारने कॅप्टन रॉबर्ट गिल यांना मेजर पदावर पदोन्नती देऊन ‎लेण्यांची चित्रे काढण्यासाठी अजिंठ्यात पाठवले. १५ वर्षांत त्यांनी लेण्यांतील १०५ कलाकृती ‎साकारल्या. त्या वेळी अजिंठ्यात लेणींच्या उत्खननाचे कामही जोरात सुरू होते. हजारो मजूर या ‎कामात गुंतले होते. यातच एक लेणापूर गावाची आदिवासी मुलगी पारो परिसराची माहिती ‎असल्यामुळे गिल यांना मदत करायची, त्यांच्यात घनिष्ठ प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे तब्बल १० ‎वर्ष एकत्र राहत होते. या प्रेमाला ग्रामस्थांचा विरोध होता. म्हणूनच ग्रामस्थांनी तिला विष पाजून ‎मारुन टाकले असे एक कथा सांगते, तर पारोचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचेही सांगितले जाते.

पारोच्या स्मरणार्थ गिल यांनी अजिंठा गावातील दिल्ली गेटजवळ संगमरवरी समाधी बांधली. त्यावर ‎इंग्रजीत " IN THE MEMORY OF MY BELOVED PARO WHO DIED 23 JULY 1856' असे लिहिले आहे. ‎रॉबर्ट यांचा भुसावळच्या रेल्वे इस्पितळात १० एप्रिल १८७९रोजी मृत्यू झाला. पारोची समाधी ‎आजही अजिंठा गावात आहे. तिच्या समाधी पासुन थोड्या अंतरावर रॉबर्टचे घर आहे. त्या घराला ‎लोक गिल टेक नावाने ओळखतात . दीडशे वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या लेणीं माहिती जगभरात पोहचवण्यासाठी ज्या आदिवासी कन्या पारोने ‎मदत केली, तिची अजिंठा गावातील समाधी साफ दुर्लक्षित आहे. पारोच्या जातीच्या हक्कावरुन दोन ‎जातीमध्ये वाद आहेत. त्यामुळेच मे २०१२मध्ये पारो आणि इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्ट गिलची ‎प्रेमकथा मांडण्यास नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अजिंठा चित्रपटाला कडाडून विरोध झाला होता.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या प्रत्यक्षात घडलेल्या प्रेमकथेवर आधारित 'कल्पद्रुमाची डहाळी' नावाची कथा लिहिली आहे, ती त्यांच्या In search of the Oasis या पुस्तकात अंतर्भूत आहे. मराठीच्या एका शालेय पुस्तकात तो एक धडा होता.