Jump to content

"केशवराव भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ [[पद्मावती वर्तक]], म.रा. रानडे, [[पार्श्वनाथ आळतेकर]], [[के.नारायण काळे]], ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत [[ज्योत्स्ना भोळे]] होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.

दरवर्षी एखाद्या उत्तम संगीतकाराला [[स्वरानंद प्रतिष्ठान|स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे]] केशवराव भोळे यांच्या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो.
दरवर्षी एखाद्या तरुण आश्वासक संगीतकाराला [[स्वरानंद प्रतिष्ठान|स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे]] केशवराव भोळे यांच्या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो. २०१४ साली हा पुरस्कार [[राहुल रानडे]] यांना मिळाला होता.

== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

१२:५४, २२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

केशवराव भोळे(पूर्ण नाव : केशव वामन भोळे) (मे २३, (जन्म :१८९६ - मृत्यू : १९६७) हे मराठी संगीतकार होते.

जीवन

केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले.

१९३२ साली त्यांचे दुर्गा केळेकरांशी लग्न झाले. लग्नानंतर त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.

केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के.नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत ज्योत्स्ना भोळे होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.

दरवर्षी एखाद्या तरुण आश्वासक संगीतकाराला स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे केशवराव भोळे यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१४ साली हा पुरस्कार राहुल रानडे यांना मिळाला होता.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
माझे संगीत मौज प्रकाशन
अंतरा मौज प्रकाशन
अस्ताई मौज प्रकाशन

बाह्य दुवे